शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

जेष्ठ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत कोरोना लसीची भीती; पहिल्याऐवजी तिसऱ्या टप्प्यात लस घेण्याची मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 2:41 PM

Fear of corona vaccine among senior doctors, health workers : कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे.

ठळक मुद्देलसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यापासून ही उदासीनता घालविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचेवरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रारंभी लस घेऊन हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : अवघ्या देशवासीयांचे कोरोना लसीकडे डोळे लागले आहेत. या महामारीला संपविण्यासाठी लसीकडे वैद्यकीय शस्त्र म्हणून पाहिले जात आहे; मात्र लसीकरणानंतर शरीरावर काही परिणाम होईल का, ही भीती सध्या ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना सतावत आहे. त्यातूनच पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यांत म्हणजे ५० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणादरम्यान लस घेण्याची मानसिकता वाढत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लस केवळ आरोग्यसंबंधित डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. गेल्या वर्षभर कोरोनायुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस मिळणार असल्याने समाधान व्यक्त आहे. परंतु, ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. यातील अनेकांना मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, आदी आजार आहेत. त्यातून काही दुष्परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याऐवजी तिसऱ्या टप्प्यात लस घेण्यास प्राधान्य देऊ, असे मत ५० वर्षांवरील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी वरिष्ठांकडे व्यक्त करीत आहेत.

वरिष्ठांनी निर्माण करावा विश्वासलसीबाबतचा गैरसमज, चुकीची माहिती आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. कोणत्याही गैरसमजांना खतपाणी मिळू नये यासाठी लसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यापासून ही उदासीनता घालविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. लस टोचून घ्यावी यासाठी लसीबाबत मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रारंभी लस घेऊन हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.

अर्धा तास ठेवणार लक्षलसीकरण केंद्रावर लस घेतल्यानंतर पुढील अर्धा तास लसीचे परिणाम पाहण्यासाठी व्यक्तीला तेथे थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही काळजी करण्याची गरज नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लस ही फायदेशीरचनियोजित टप्प्यांनुसार लसीकरण पार पाडले जाणार आहे. लसीविषयी कोणत्याही प्रकारे भीतीचे वातावरण नाही. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लस फायदेशीर ठरणार आहे.- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक‌‘आयएमए’तर्फे आवाहनकाही प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांत लसीची भिती आहे. लसीकरणानंतर जेव्हा लोक ठणठणीत दिसतील, तेव्हा ही भीती आपोआप दूर होईल. लस घेणे हे बंधनकारक नाही; पण नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशांना नोंदणी करण्याचे आवाहन ‘आयएमए’तर्फे केले जात आहे.- डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस