फौजिया खान यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत दिलासा ?

By Admin | Updated: May 30, 2014 00:22 IST2014-05-30T00:08:51+5:302014-05-30T00:22:12+5:30

सतीश जोशी , परभणी राष्टÑवादी काँग्रेस अंतर्गत अचानक निर्माण झालेल्या राजकीय बदलाचा फटका परभणीला बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती

Faujia Khan relief till the Vidhan Sabha election? | फौजिया खान यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत दिलासा ?

फौजिया खान यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत दिलासा ?

 सतीश जोशी , परभणी राष्टÑवादी काँग्रेस अंतर्गत अचानक निर्माण झालेल्या राजकीय बदलाचा फटका परभणीला बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, कुठलीही राजकीय हानी न करता हे वादळ शांत झाले आणि राज्यमंत्री फौजिया खान यांच्या वर्तुळाने नि:श्वास टाकला. काल २८ मे रोजी राष्टÑवादी काँग्रेस अंतर्गत बदल होणार असून प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असे एक वृत्त तर राज्यमंत्री फौजिया खान यांना मंत्रीमंडळातून वगळणार असे दुसरे वृत्त इलेक्ट्रॉनिक्स माध्यमानी दिवसभर वाजविले. हा बदल २९ रोजी होणार असल्याचेही सांगण्यात येत होते. या वृत्ताची चर्चा परभणी जिल्ह्यात जशी पसरत होती, तसे राजकीय नेतमंडळी आणि कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचे मोबाईल्स विचारपूस करण्यासाठी वाजत होते. परभणी जिल्ह्यास मिळालेले मंत्रीपद हे गटबाजीच्या राजकारणात जाणार, अशी खंत सर्वसामान्यांना वाटत असताना दुसरीकडे मात्र विरोधकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. फौजिया खान यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ हा मार्च महिन्यातच संपला आहे. सहा महिने म्हणजे आॅक्टोबरपर्यत त्या मंत्रीपदावर राहू शकतात. तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालेला असेल. फौजिया खान ह्यांच्याकडे पक्षात उच्चशिक्षित वर्ग, अल्पसंख्यांक आणि महिलांचे प्रतिनिधी म्हणून बघितले जाते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना बदलणे म्हणजे यावर्गाची नाराजी ओढवेल, असे पक्षाला कदाचित वाटले असावे. या पार्श्वभूमीवरच त्यांचे मंत्रीपद विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिले. लोकसभा निवडणुकीत फौजिया खान आणि त्यांचे पती तहसीन अहमद खान यांनी पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या विरोधात प्रचार केला अशा तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्या होत्या. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. फौजिया खान यांना बदलावे, अशी मागणीही त्यांच्या विरोधकांतर्फे करण्यात येत होती. यासंदर्भात श्रेष्ठींनी संबंधितांचे म्हणनेही ऐकूण घेतले होते. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांंनी रान उठवूनही फौजिया खान ह्या त्यांना पूरून उरल्या. जिल्ह्यातील विरोधकांच्या कारवायांना यशश्वी सामोरे जात पक्षातील आपले स्थान किती मजबूत आहे, हे त्यांनी यानिमित्ताने सर्वांनाच दाखवून दिले.लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर फौजिया खान यांना अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न अखेर फोल ठरला.

Web Title: Faujia Khan relief till the Vidhan Sabha election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.