शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

चिऊताईंचा बाबा ! दाणापाण्याच्या शोधात आलेल्या दोन चिमण्यांचं कुटुंब आता शंभरावर गेलंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 3:48 PM

चिमण्यांसाठी माहेर झालंय मोईनोद्दीन शेख यांचे घर  

ठळक मुद्दे सकाळी तांबडं फुटलं की, चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होऊन जातो.चिमण्यांची संख्या वाढत गेली तसा घरच्यांनाही लळा लागला

- भागवत हिरेकर

औरंगाबाद : पक्ष्यांना माणसांचा लळा लागला की, ते हक्कानं घरादारात वावरायला लागतात. एकदम निश्चिंत होऊन. असंच हस्ताजवळील (ता.कन्नड) नवाट वस्तीवरील मोईनोद्दीन शेख यांचं एक घर चिमण्यांसाठी माहेर झालंय अन् मोईनोद्दीन अजीज शेख चिमण्यांचे बाबा! दाणापाण्याच्या शोधात आलेल्या दोन चिमण्यांचं कुटुंब आता शंभरावर गेलंय. त्यांच्यासाठी मोईनोद्दीन शेख यांनी घरटी केली. दाणापाण्याची बडदास्त ठेवलीय. त्यामुळे या चिमण्यांनी नातवंडांसारखाच त्यांच्या अवघ्या घराचा ताबा घेतला आहे. हल्ली चिमण्या दिसत नाहीत, असा तक्रारीचा स्वर उमटत असताना शेख यांच्या घरादारात पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त चिवचिवाटच घुमत राहतो.

वन विभागातील मोईनोद्दीन अजीज शेख सध्या गौताळा अभयारण्यात कर्तव्यावर असतात. नोकरी करीत असताना पशू-पक्ष्यांची पाण्याअभावी होणारी तडफड त्यांनी बघितलेली. त्यातूनच ते घरासमोर रांजणाच्या आजूबाजूला पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचे. मग या चिमण्या त्यांच्याकडे आल्या. त्यांची कथा मोईनोद्दीन शेख यांनी सांगितली. ‘पक्ष्यांना पाणी ठेवायचो. यातच दोन अडीच वर्षांपूर्वी दोन-तीन चिमण्या यायला लागल्या. तांदूळ, गव्हाचा भरडा आणि पाणी एकाच ठिकाणी मिळायचं म्हणून त्या इथंच रमल्या. मग त्यांच्यासाठी घरटी तयार केली. त्यामुळं चिमण्यांची संख्या वाढतच गेली. आजघडीला शंभरावर चिमण्या इथं राहतात. त्यासाठी मी २५ -३० घरटी , तर त्यांनीही खिडक्या, घरात जिथं जागा मिळेल तिथं घरटी तयार केलीय. अशी पन्नास-साठ घरटी घरात आहेत. आता तर सकाळी तांबडं फुटलं की, चिमण्यांचा चिवचिवाट सुरू होऊन जातो.

त्यांचेही हट्ट... चिमण्यांसाठी तांदूळ, गव्हाचा भरडा हे खायला असतोच; पण सकाळी घरात स्वयंपाक सुरू झाला की, चिमण्या आजूबाजूला गर्दी करतात. भाकरी करताना त्यांना पिठाचे गोळे टाकावेच लागतात. नाही तर त्याचा गोंगाट वाढतच जातो. तेच जेवतानाही. ताटात भात असेल, तर त्यांना द्यावा लागतोच, हे सांगताना मोईनोद्दीन शेख आणि या चिमण्यांमध्ये तयार झालेलं नातं दिसून येतं.

मग घरच्यांनाही लळा लागलासुरुवातीला कमी चिमण्या होत्या. त्या हळूहळू वाढत गेल्या. या चिमण्या घरटी तयार करण्यासाठी गवत, काड्या घेऊन यायच्या. ते घेऊन येताना, घरटी बनवताना घरात पडायचं आणि सतत कचरा व्हायचा. त्यामुळं बायको चिडचिड करायची; पण आता हे सगळं करताना तिची चिडचिड होत नाही. उलट तिलाही त्यांचा लळा लागला आहे.

वेगळे समाधान मिळते फॉरेस्ट डिर्पाटमेंटमध्ये काम करताना पक्ष्यांविषयी आपुलकी वाटू लागली. मग त्यातूनच पुढं घराच्या समोर पाणी आणि तांदूळ टाकायचो. शेतातच राहायला असल्याने याच काळात दोन-तीन चिमण्या आल्या. आता त्यांनी घरटी केली. काही मी केली. त्यासाठी डबे, पाईप विकत आणले. त्यांचा गोतावळा एवढा मोठा झाला आहे की, शंभर चिमण्या इथं बिनधास्त राहताहेत. हे करण्याच वेगळं समाधान मला मिळतं.- मोईनोद्दीन शेख

 

 

टॅग्स :Natureनिसर्गSocialसामाजिकHomeसुंदर गृहनियोजन