शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

स्वत:च्या अल्पवयीन मुलाकडून घरफोडी करून घेणारा बाप अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 7:43 PM

पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले

औरंगाबाद: स्वत:च्या पंधरा वर्षाच्या मुलाकडून पैठण येथे घरफोडी करणाऱ्या बापाला स्थानिक गुन्हेशाखेने २३ नोव्हेंबर रोजी अटक केली. अटकेतील आरोपीकडून सोन्याचे दागिने विक्री करून आलेली २ लाख ८० हजाराची रोकड आणि ८० ग्रॅम सोन्याची लगड आणि ७ ग्रॅमचे दागिने असा सुमारे ६ लाख १८ हजार ८००रुपयांचा ऐवज जप्त केला.

रंगनाथ सुब्रमण्यम कस्तुरे(रा. कातपुर, ता. पैठण)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले की, कातपुर शिवारातील मुकुंद शांताराम जोशी हे सहकुटुंब भंडारदरा येथे १७ नोव्हेंबर रोजी गेले होते. १८ रोजी रात्री २ वाजता ते घरी परतले तेव्हा चोरट्यांनी घरफोडून ८ तोळ्याचे दागिने आणि रोख ४१ हजार रुपये चोरून नेल्याचे त्यांना दिसले. याविषयी त्यांनी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला तेव्हा ही चोरी  रंगनाथ कस्तुरे याने त्याच्या (विधीसंघर्षग्रस्त बालक)१५ वर्षीय मुलाकडून करून घेतल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.

पोलिसांनी संशयित आरोपी रंगनाथला त्याच्या घरातून उचलले तेव्हा त्याने स्वत:च्या मुलाकडून चोरी करून घेतल्याची कबुली दिली.  घरफोडीतील सोन्याचे दागिने पैठण येथील एका दुकानदाराला २ लाख८० हजार रुपयांत विक्री केल्याचे सांगितले. तसेच त्यातील रोख  ४० हजार रुपये आणि सात ग्रॅमचे दागिने मुलाकडे दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी पैठण शहरातील त्या सोनाराचे दुकान गाठून दुकानदाराकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आरोपीकडून दागिने खरेदी केल्याची कबुली दिली आणि खरेदी केलेल्या दागिन्याची लगड तयार केल्याचे सांगितले. तयार लगड त्याने पोलिसांच्या हवाली केली. नंतर पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याजवळील रोख ४० हजार रुपये आणि सात ग्रॅमचे दागिने हस्तगत केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, कर्मचारी संजय काळे प्रमोद खांडेभराड, राहुल पगारे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक