शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

सिल्लोडमध्ये बस-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, २७ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 20:20 IST

या भीषण अपघातात बसचा चालक गंभीर जखमी आहे

सिल्लोड: सिल्लोड -भराडी रस्त्यावर वांगी फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बस व गॅस वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात पिकअप चालक जागीच ठार झाला तर बसमधील २७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज संध्याकाळी ६ वाजेच्या दरम्यान झाला. बसचा चालक गंभीर जखमी आहे. तर २० प्रवाशांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सुरेश सांडू गुंजाळ ( ४२ वर्ष रा.पिंपळगाव पेठ) असे मृत पिकअप चालकाचे नाव आहे. धडक ऐवढी जोरदार होती की बसमध्ये अडकलेले पिकअप वाहन जेसीबीच्या मदतीने वेगळे करण्यात आले. बसचा चालक मधुकर राजधर आमटे ( रा.देऊळगाव बाजार ) गंभीर जखमी असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवले आहे.

सिल्लोड पाचोरा ही बस सिल्लोड हुन पाचोरा ( बस क्रमांक एम एच १४ बी टी ४००६) कडे जात होती तर गॅस वाटप करून पिकअप भराडीहून रिकामे सिलेंडर घेऊन सिल्लोड कडे येत होता. दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहने समोरासमोर धडकली. रिकामे सिलेंडर रस्त्यावर पसरून वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर, नंदकिशोर सहारे, राजू गौर, राजेंद्र ठोंबरे, महंमद हनिफ, सुनील मिरकर, प्रवीण मिरकर, इरफान पठाण, शेख बबलू यांनी जखमींना मदत केली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मागतीने जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

धन्वंतरी असोसिएशन धावली मदतीला... उपजिल्हा रुग्णालयात डॉ.अनिरुद्ध गायकवाड, डॉ. राम मोहिते हे दोनच डॉक्टर हजर होते. यामुळे धन्वंतरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश मिरकर, डॉ. शेखर दोड, डॉ. लीना झलवार, डॉ. सोपान म्हस्के, डॉ. विनोद लोखंडे, डॉ. इब्राहिम, डॉ. शकील खान, डॉ. अभिलाष गोलेचा यांच्यासह इतर डॉक्टरांनी रुग्णालयात धाव घेत जखमींवर उपचार केले.

जखमींची नावे:एकनाथ देवराव पाटील, महादू देवराव पाटील, वसंत पांडुरंग पाटील ( तिघे रा  नांदगाव ता सोयगाव), रामा लक्ष्मण दांडगे रा. घाटनांद्रा, शिफा आरेफखान रा. मुंबई, सुनंदा नारायण फोलाने रा.उपली, तुकाराम कडूबा सावळे रा.बोरमाळ तांडा, दादा विठोबा तायडे रा. आमठाणा, सुरेखा महेंद्र खरात रा.वरम जि. कल्याण, रजीया सिराज देशमुख रा.चारनेर, अलिमा आरेफखान रा. मुंबई, फकिरा कौतिक मोरे रा. घाटनांद्रा, पंडित बाबुराव शिंदे रा.जांभई, सुभद्रा गणेश गोरे रा.भराडी, शंकर जमनाजी मालोदे रा. घाटनांद्रा, गणेश नारायण गोरे रा.भराडी, चंद्रभान चिंतामण बनकर रा.धावडा, रुबिना उस्मान पठाण रा.कासोद, सुनीताबाई सोमनाथ बोंबले रा.धामणगाव, सरस्वतीबाई आनंदा फोलाने रा.उपळी,युवराज नारायण सरावडे  रा.देऊळगाव वाडी, कांचना अशोक फोलाने रा.उपळी, जिनत सिराज देशमुख रा.चारनेर, किसन उखडू शेळके रा. चारनेरवाडी, मोहमद अकिल पटेल रा.धामणी ता. कन्नड.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद