शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाचणीत जलशुद्धीकरण केंद्र नापास! तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून वारंवार चुका, वाढीव पाण्याला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 19:43 IST

१५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले. याची टेस्टिंग गुरुवारपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी चाचणीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) तज्ज्ञ अधिकाऱ्यांना अपयश आले. जलशुद्धीकरण केंद्रात पडत असलेले पाणी परत जलवाहिनीद्वारे उलट दिशेने जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यामुळे चाचणी थांबवून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू झाले. हे काम किती दिवस चालेल, हे निश्चित नाही. १५ ऑगस्टपर्यंत तरी वाढीव पाणी मिळण्याची चिन्हे नाहीत.

पाणीपुरवठा योजनांवर काम करण्याचा दांडगा अनुभव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे शासनाने २४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम मजीप्राकडे सोपविले. या कामातही प्रचंड उणिवा असल्याचे दिसत आहे. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत शहराला वाढीव पाणी मिळावे, या हेतूने २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकली. त्यासाठी लागणारे जलशुद्धिकरण केंद्रच मजीप्राने तयार केले नव्हते. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कसेबसे जलशुद्धीकरण केंद्र तयार झाले. २६ एमएलडी पाण्यासाठी गुरुवारपासून चाचणी सुरू केली. पहिल्या दिवशी यातील पाणी उलट दिशेने जात असल्याचे लक्षात आले. पाणी शुद्ध होण्यात अनेक अडचणी येत असल्याने टेस्टिंग थांबविण्यात आली. शुक्रवारीही चाचणीचे काम झाले नाही. कारण गुरुवारी दिसलेल्या अडचणींवर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच चाचणी सुरू होईल.

१५ ऑगस्टपूर्वी पाणी मिळणे अशक्यमजीप्राने चाचणीसाठी ७०० आणि ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे शहराला कमी पाणी मिळू लागले. १५ ऑगस्टपूर्वी शहराला २६ एमएलडी तरी वाढीव पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चाचणी अयशस्वी ठरल्याने लवकर वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

नागरिकांना वेठीस धरणारे दोषी कोण? १) ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून ७५ एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असा दावा अगोदर करण्यात आला होता. प्रत्यक्षात १२ एमएलडी पाणी फारोळ्यापर्यंत येऊ लागले. नवीन जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाल्यावर किमान २६ एमएलडी पाणी मिळेल, असे दिवास्वप्न शहरवासीयांना दाखविण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्र उभारणाऱ्या कंत्राटदाराला ६ महिन्यांपासून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. संपूर्ण शहराला वेठीस धरणाऱ्या दोषींवर मजीप्रा कोणती कारवाई करणार आहे? २०० कोटींच्या कामाला प्रकल्प सल्लागार समिती आहे, तर तांत्रिक अडचणी येतातच कशा?

२) नवीन जलशुद्धीकरण केंद्रातील चाचणी फसली. फिल्टर बेट, ड्रेनमधील पाणी उलट येत आहे. त्यामुळे परत दुरुस्तीचे काम करावे लागणार? यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. या उधळपट्टीला जबाबदार कोण? कंत्राटदाराला दररोज दंड लावण्यात येतोय, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात दंडाची ही रक्कम वसूल होणार आहे का? या दंडामुळे शहरवासीयांना होणारा पाण्याचा त्रास कमी होणार का? मजीप्रा हा तज्ज्ञ शासकीय विभाग असताना अशा मोठ्या चुका होतातच कशा?

३) १९७३ पासून शहराची तहान भागविणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी कायमस्वरूपी बंद करा, असा आग्रह मजीप्राचा मनपासमोर आहे. ही जलवाहिनी सध्या शहराला ३५ ते ४० एमएलडी पाणी देते. ही जलवाहिनी बंद केली तर नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी मिळेल, असा अजब दावा केला जातोय. मनपाने हा प्रस्ताव मान्य केला तरी ९०० मिमीमधून खात्रीशीर ७५ एमएलडी पाणी मिळायला तर हवे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका