शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मूग, उडदाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 14:18 IST

मूग, उडीद, बाजरी, मक्याचे पीक हाती लागले त्यालाही हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

औरंगाबाद : एकीकडे पावसाने दगा दिल्याने खरिपाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातून जे मूग, उडीद, बाजरी, मक्याचे पीक हाती लागले त्यालाही हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. सरकार हमीभावाची केवळ घोषणा करीत आहे. प्रत्यक्षात मात्र, हातात कमीच रक्कम मिळत असल्याने आता हमीभाव प्रत्यक्षात हातात मिळावा याची ‘हमी’ सरकारने घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली होती. यात मुगाचा हमीभाव १,४०० रुपये वाढवून ६,९७५ रुपये प्रतिक्विंटल केला आहे. बाजरीत ५२५ रुपये हमीभाव वाढवत १,९५० रुपये, तर मका २७५ रुपयांनी वाढवीत १,७०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला. दुसरीकडे पाऊस कमी पडल्याने मूग व उडदाचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी, तर बाजरीचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटल्याचा अहवाल कृषी विभागाने  सरकारला पाठविला आहे.

अशा परिस्थितीत खरिपातील धान्यास हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात अडत बाजारात भाव वाढण्याऐवजी कमी भावात मूग, बाजरी, मका विकला जात आहे. जाधववाडी येथील कृ.उ.बा.च्या अडत बाजारात शेतकऱ्यांना गुरुवारी मूग ४,५०० ते ५,५०० रुपये, बाजरी १,७५० ते १,८५० रुपये, तर मका १,००० ते १,०५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हमीभावापेक्षा मुगात प्रतिक्विंटलमागे १,४७५ ते २,४७५ रुपये कमी भाव मिळत आहे. बाजरीत क्विंटलमागे १०० ते १५० रुपये, तर मक्यामध्ये ७०० रुपये कमी भाव मिळत आहे. नुसते हमी भाव जाहीर करून सरकारने मोकळे होऊ नये, तर प्रत्यक्षात हमी भाव मिळेल याची पर्यायी व्यवस्थाही करावी, अशी मागणी शेतकरी सखाराम वाघमारे, वैभव तांबे, सदानंद वैष्णव यांनी केली. 

शेतकरी, अडत व्यापारी म्हणतात...हमीभावापेक्षा १५० रुपये कमी भाव मिळाला आज ५ गोणी बाजरी विक्रीला आणली. अडतमध्ये १,८०० रुपये क्विंटलने बाजरी विक्री झाली. प्रत्यक्षात हमीभाव १,९५० रुपये एवढा आहे. सरकारने हमीभाव मिळावा यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. -पाराजी पचलोरे (शेतकरी, कोलठाणवाडी)

हमीभावात दर्जा ठरवावासरकार एफएक्यू दर्जाच्या शेतीमालास हमीभाव जाहीर करीत असते. मात्र, मध्यम व हलक्या प्रतीच्या शेतीमालाचे हमीभाव ठरवून देत नाही. यामुळे खरेदीत अडचणी येत आहेत. सरकारने एका शेतीमालाचे दर्जानुसार तीन हमीभाव जाहीर करावेत. -कैलास निकम, अडत व्यापारी

मध्यप्रदेशच्या धर्तीवर योजना लागू करावीमध्यप्रदेश सरकार हमीभाव जाहीर करते व खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरात अडत्यांनी धान्य खरेदी केले, तर भावांतर योजनेंतर्गत येणारी तफावत सरकार थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. यामुळे सरकारी यंत्रणेवरचा मोठा खर्च वाचतो, भ्रष्टाचार होत नाही. शेतकऱ्यांना हमीभावही मिळतो, तसेच ज्या धान्य, कडधान्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला. त्यांना तफावत देण्याची गरज नाही. याच धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना जाहीर करावी. -कन्हैयालाल जैस्वाल, अध्यक्ष, अडत व्यापारी संघटना

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रState Governmentराज्य सरकार