शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतक ऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी

By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात २३ जुलै २०१३ रोजी सकाळी १0 ते रात्री ११ अशा तब्बल १३ तासांत ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला होता. वर्ष उलटल्यानंतरही अतोनात नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहींना तुटपुंजी मदत मिळाली.नदी-नाल्यांच्या काठावरील शेतांमधून पूर गेल्याने जमिनीसह खरीप पिके वाहून गेली होती. तर अनेकांची घरे पडली होती. व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुक सान झाले होते. मंठा ते लोणार रोडवरील वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून तर रात्री ३ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. अतिवृष्टीला एक वर्ष पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचा डोळ््यांत आजही पाणी येत आहे. मागील वर्षीही यावर्षीप्रमाणे तळणी मंडळात मोठा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र २३ जुलै रोजी मुसळधार पावसाने तळणीसह परिसरातील सर्वच तलाव ओव्हर फ्लो झाले होते. आईचा तलाव तुडुंब भरु न फु टण्याचा मार्गावर होता. भीतीने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. पाझर तलाव गट क्र .७२६ मधील तलाव क्र . १० रात्री फु टल्याने शेकडो हेक्टर जमिनीतून पूर गेल्याने जमिनी खरडून खरिपाची पिके वाहून गेली. तर शेतोपयोगी साहित्य, नेट-शेड, ठिबक संच, पाईप वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. वडगाव (सं) येथील सरस्वती नदीला पूर आल्याने अर्ध्या गावात पाणी शिरले होते. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तर नदीला पूर आल्याने सायंकाळी ६ वाजेपासून लोणार व मंठ्याक डे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रात्री ११ वाजता पाऊस थांबल्यामुळे ३ वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. वाघाळा, देवढाणा, कोकंरबा या गावाक डे जाण्याऱ्या नाल्यांना पूर गेला. प्रथमच तळणी मंडळात ३७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. मदतीचे आश्वासन दिले. मात्र अनेकांना तुटपुंजी मदत मिळाली तर अद्यापही मदतीपासून वंचित आहेत. एका रात्रीतून शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले होते. एका वर्षानंतरही शेतकरी त्या अतिवृष्टीतून सावरलेला नाही. आठवण येताच डोळ्यात पाणी येत असल्याचे पूरग्रस्त शेतकरी मांगीलाल चव्हाण, शिवाजी गुजर, ज्ञानेश्वर सरक टे, लक्ष्मण राऊत, मीराबाई गत्ते, कैलास पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)