शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पट्टीसाठी शेतकर्‍यांची हेळसांड

By admin | Updated: May 24, 2014 00:44 IST

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत.

नांदेड : गत काही दिवसांपासून बाजारावर तेजी नसल्याने शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार मंद गतीने सुरु आहेत. विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे विशिष्ट वेळेत देण्याचा नियम व्यापार्‍यांकडून धाब्यावर बसविण्यात येत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पैशासाठी खाजगी सावकाराचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. या प्रकाराकडे मात्र बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीसह भुईमूग, ज्वारी, गहू आदी पिकांची आवक सुरु आहे. त्यात हळदीची आवक प्रचंड असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. आडत्याने आपल्याकडील शेतमालाची खुल्या पद्धतीने विक्री करु नये, असा लिखित नियम बाजार समिती प्रशासनाने काढला आहे. यामुळे प्रत्येक आडत दुकानदार बीटाद्वारेच पक्या पावतीद्वारे हळदीची विक्री करीत आहे. मात्र एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागत आहे. ज्या शेतकर्‍यांचा शेतमाल लिलावामध्ये विक्री केला. त्या शेतकर्‍यांना आडत व्यापार्‍यांनी चोवीस तासांच्या आत पट्टी देण्याचा नियम आहे. परंतु शेतमालाची विक्री करुनही पंधरा ते पंचवीस दिवस शेतकर्‍यांना पैसे मिळत नाहीत. या प्रकाराने शेतकरी पुरता हताश झाला आहे. बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याचे कारण दाखव खरेदीदारही खरेदीकडे पाठ फिरवत आहेत.परिणाम शेतमाल मोंढ्यात आणूनही विक्री होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वाट पाहत लागत आहे. शेतकर्‍यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्‍यांना खरेदीदारांची मनधरणी करावी लागत आहे. बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवस तर विक्री केलेल्या हळदीचे माप करण्यासाठी पुन्हा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर शेतमालाची पट्टीही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत येत नाही. शेतमाल विक्रीसाठी मोंढा बाजारात आणूनही पैशासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. खरीप पेरणीचा हंगाम जवळ येवून ठेपल्याने खत-बियाणाच्या खरेदीसाठी शेतकर्‍यांपुढे अडचणी वाढत आहेत. (प्रतिनीधी)शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या शेतमालाची पट्टी चोवीस तासांत देण्याचा नियम आहे, परंतु शेतकर्‍यांना पंधरा ते वीस दिवसांपर्यंत व्यापार्‍यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना शेतमालाचे तत्काळ पैसे द्यावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे.