शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम आखणार

By admin | Updated: February 16, 2016 23:43 IST

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी आगामी काळात सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील ठरेल

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी आगामी काळात सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कृतिशील ठरेल, असा उपक्रम हाती घेण्याचा निश्चय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आजी, माजी विद्यार्थ्यांनी केला़ विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा रविवारी पार पडला़ विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले़ अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ़ व्ही़ के़ पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ व्ही़एम़ मायंदे, वनामकृविचे माजी कुलगुरु डॉ़ के़पी़ गोरे, आ़ डॉ़ राहुल पाटील यांची उपस्थिती होती़ प्रारंभी प्रा़ रामभाऊ घाटगे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला़ या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तेलंगणातील खासदार बी़बी़ पाटील, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी परिवहन आयुक्त श्यामसुंदर शिंदे, मुख्य वन संरक्षक पी़एऩ मुंडे, माजी जिल्हाधिकारी शालीग्राम वानखेडे, फलोत्पादन संचालक एस़एल़ जाधव, मुख्य वनसंरक्षक जी़पी़ गरड, अन्न व औषधी प्रशासनाचे उपायुक्त सुरेश अन्नपुरे, उपायुक्त जितेंद्र पापडकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य रघुनाथराव जाधव, जिल्हा कृषी अधिकारी टी़एस़ मोटे, साहेबराव दिवेकर, गोविंदराव पवार, प्रकाश खंदारे, उद्योजक कालिदास जाधव, अ‍ॅड़ मंडलिक आदींचा सत्कार करण्यात आला़ तसेच यावर्षी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यापीठाचे विद्यार्थी संदीप चव्हाण, सय्यद इम्रान हाश्मी, विकास भुजबळ आदी ४० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमात विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची अस्थायी संघटना स्थापन करण्यात आली़ या संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे सोपविण्यात आली़ तसेच कार्याध्यक्षपदी प्रा़ रामभाऊ घाटगे, सचिवपदी प्रा़ दिलीप मोरे, सहसचिवपदी प्रा़ डॉ़ पी़ आऱ झंवर यांची नियुक्ती झाल्याचे रवींद्र देशमुख यांनी जाहीर केले़ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमास देशभरात विविध संस्थांमध्ये उच्चपदावर काम करणारे अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते़ विद्यापीठाचे हे माजी विद्यार्थी स्रेहमेळाव्याच्या निमित्ताने परभणीत एकत्र आले होते़ मराठवाड्यात सद्यस्थितीत दुष्काळी परिस्थिती आहे़ या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच कृतीशील कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले़ माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला़ प्रा़ डॉ़ माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़ रवींद्र देशमुख यांनी आभार मानले़ मेळाव्यास कृषी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)