शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोमुळे शेतकऱ्यांचे केचप

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

औरंगाबाद : पिकते तेथे विकत नाही, अशी म्हण आहे. सध्या ही म्हण टोमॅटोला तंतोतंत लागू होत आहे.

औरंगाबाद : पिकते तेथे विकत नाही, अशी म्हण आहे. सध्या ही म्हण टोमॅटोला तंतोतंत लागू होत आहे. एकीकडे भाव इतके घसरले की किलोमागे २ ते ३ रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत, वाहतूक खर्चही निघत नसल्याने हताश झालेला बळीराजा रस्त्यावरच टोमॅटो फेकून देत आहे. दुसरीकडे हेच टोमॅटो शहरातील भाजीमंडईत व्यापारी १५ ते २० रुपये किलोपर्यंत विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील मालास मातीमोल भाव आणि तोच माल व्यापाऱ्यांच्या हातात आला तर त्यांची चांदी होते. हा विरोधाभास टोमॅटोच्या व्यवहारात दिसून येत आहे. जाधववाडी बाजारपेठेत शनिवारी ४२५ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. श्रीरामपूर, सोलापूर, लातूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आदी भागांतून टोमॅटो विक्रीला येत आहे. ४०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल टोमॅटो विक्री झाल्याची आकडेवारी बाजार समितीने दिली. औरंगपुरा भाजीमंडईत आज १५ ते २० रुपये किलोने हा टोमॅटो विक्री झाला. श्रीरामपूरहून औरंगाबादेतील अडत बाजारात आणलेला टोमॅटो ४ ते ६.५० रुपये प्रतिकिलो दर मिळतो आणि जाधववाडीतून शहरातील भाजीमंडईत तो टोमॅटो येतो त्यास १५ ते २० रुपये दर मिळतो. दुष्काळाने आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सागर पुंड या विक्रेत्याने सांगितले की, जाधववाडीत ४ ते ७ रुपयांपर्यंत आम्हाला टोमॅटो विकत मिळतो, मंडईपर्यंत आणण्यासाठी लोडिंग रिक्षाचे भाडे लागते, नफा मिळून त्याची रक्कम दुप्पट होते. शेतकऱ्यांना टोमॅटोचा मातीमोल भाव, तर ग्राहकांना अधिक पैसे मोजून टोमॅटो घ्यावे लागत आहेत.