वडवणी : तालुक्यातील पुसरा येथे एका शेतकर्याच्या घरामध्ये शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज लंपास केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.गणेश मधुकर जोगदंड यांचे गावातील मुख्य रस्त्यावर घर आहे. घरासमोरील लोखंडी दरवाजा तोडून चोरांनी आत प्रवेश केला. जोगदंड कुटुंबीय झोपलेल्या खोलीचे दरवाजे चोरांनी बंद केले. त्यानंतर कपाट असलेल्या खोलीत जावून १३ तोळे दागिने व रोख ३0 हजार रूपये असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास केला. श्वानपथकाने माग काढण्याचा प्रयत्न केल्याचे सहायक निरीक्षक संतोषसाबळे म्हणाले. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}