शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

By admin | Updated: August 1, 2014 01:04 IST

परळी/मांडवा: तालुका परिसरात पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दोन मोठ्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या.

परळी/मांडवा: तालुका परिसरात पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दोन मोठ्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. आता पावसाने पुन्हा दडी मारली असल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यासाठी सरसावले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये सकाळी ९ वाजेपासूनच गर्दी होत आहे.पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. त्यामुळे गुरुवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेसमोर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून असेच चित्र पहावयास मिळत आहे. बँकेसह तलाठी कार्यालयातही तोबा गर्दी झाली आहे. सातबारा वेळेवर मिळत नसल्याने सकाळपासून शेतकरी तेथे जाऊन थांबले होते. सातबारा मिळाल्यानंतर पुन्हा बँकेच्या दारात जाऊन थांबले होते. पूर्वी पीक विम्याकडे अनेकांनी कानाडोळा केला होता. मात्र आता पाऊस बेभरवशाचा झाला असल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, ७ जून रोजी सुरु होणारा पाऊस ७ जुलैपासून सुरू झाला होता. त्यानंतरच्या कालावधीत तालुका परिसरात केवळ दोन ते तीन मोठे पाऊस झाले आहेत. या पावसावरच शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकल्या होत्या. पिके उगवली असताच पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना अक्षरश: बकेटीत पाणी नेऊन उगवलेल्या पिकांना तांब्याने पाणी टाकले. पिकांना जगविणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी आता चिंतित झाले आहेत. पाऊस जर पडला नाही तर उगवलेली पिके पुन्हा पाण्याअभावी सुकून जातील. शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीने पैसे गोळा करुन पेरण्या केल्या होत्या. आता पावसाने धोका दिला असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच तर पीकविमा भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी गर्दी दिसून येत आहे. गुरुवारी पीकविमा भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे बँकेत शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे, याची माहिती रात्रीपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. (वार्ताहर)