शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

By admin | Updated: March 26, 2015 00:54 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथे झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उपसरपंच रामेश्वर पडोळ व गुलाबराव भालेराव यांच्या शेतकरी

राजूर : भोकरदन तालुक्यातील बाणेगाव येथे झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उपसरपंच रामेश्वर पडोळ व गुलाबराव भालेराव यांच्या शेतकरी विकास पॅनलने तेरा पैकी तेरा जागांवर विजय मिळवून एकतर्फी वर्चस्व मिळविले आहे.येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत रामेश्वर पडोळ व गुलाबराव भालेराव यांचे शेतकरी विकास पॅनल तर सोमीनाथ रेवगडे व दीपक पडोळ यांचे परिवर्तन पॅनल आमने सामने होते. या निवडणुकीत एक जागा यापूर्वीच बिनविरोध काढण्यात आली. बारा जागेसाठी मतदान होऊन निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला.यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे बाराही उमेदवार मोठया फरकाने विजयी होऊन सोसायटीवर एकतफी वर्चस्व मिळविले. विजयी उमेदवारांत गुलाबराव भालेराव, रूपसिंंग जाखड, विष्णू भालेराव, देवकरण पडोळ, रामेश्वर पडोळ, आसाराम रेवगडे, गुलाबराव रेवगडे, मिलींद गंगावणे, उमाकांत नसवाले, श्रीमती हरणाबाई भालेराव, श्रीमती सत्यभामाबाई जाधव यांचा समावेश आहे तर सुखदेव घोलत हे बिनविरोध विजयी झाले होते. निवडणुकीचा निकाल अध्याशी अधिकारी घुसिंंगे यांनी जाहीर केला. त्यांना सोनवणे यांनी सहकार्य केले. गेल्या अठरा वर्षांपासून बाणेगाव सोसायटीची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.विशेष म्हणजे स्वस्त धान्य दुकान सोसायटीला जोडलेले असल्याने दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी सोसायटी ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.उपसरपंच रामेश्वर पडोळ यांच्या गटाचे असलेले विद्यामान चेअरमन सोमीनाथ रेवगडे हे ऐनवेळी विरोधी गटात सामील झाल्याने निवडणूक रंगतदार झाली होती.येथील ग्रामपंचायत निवडणुक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असून सोसायटीची निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीची नांदी ठरली होती. त्यामुळे दोन्ही गटाने प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. (वार्ताहर)