पीकविमा भरण्यासाठी बँकत शेतकऱ्यांची गर्दी
By Admin | Updated: July 28, 2014 00:53 IST2014-07-28T00:09:03+5:302014-07-28T00:53:47+5:30
पाटोदा : सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे़ त्यामुळे शेतकरी पीकविमा भरण्यासाठी गर्दी करु लागले आहेत़
पीकविमा भरण्यासाठी बँकत शेतकऱ्यांची गर्दी
पाटोदा : सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे़ त्यामुळे शेतकरी पीकविमा भरण्यासाठी गर्दी करु लागले आहेत़
रविवारी सुटीचा दिवस असतानाही येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या़ कपाशी, सोयाबीन, तूर इ. पिकांचा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे़ गतवर्षीच्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाल्याने यावर्षी गर्दी आहे़ (वार्ताहर)
पाटोदा तालुक्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदींचा केला आहे पेरा़
पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याकडे वाढला कल़
गतवर्षी पीकविम्यापोटी मिळाले होते एक कोटी
शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागल्याने रविवारीही बँक सुरु ठेवण्याचे आदेश