शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले; कर्जमाफीच्या आश्वासनाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:26 IST

सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. कर्ज माफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती. दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केली आहे.

लाडसावंगी : शेतकऱ्यांनी पीक कर्ज परतफेड न केल्याने बँकेने खाते होल्ड केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकतेच नवीन अर्थिक वर्ष सुरू झाले आहे. बँकेच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने कर्ज माफीला बगल देत ३१ मार्चपर्यंत कर्ज परतफेड करावी, असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे आश्वासन दिले त्याच्या हे विपरीत आहे. सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. कर्ज माफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती. दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केली आहे.

आधीच छत्रपती संभाजीनगर तालुक्यात परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता. यात खरिपाचे मोठे नुकसान झाले. पीक विमा अद्याप मिळाला नाही. रब्बी हंगामातील पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले नाहीत. त्यात बँकेने आता खाते होल्ड केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कर्जमाफी नाही, उलट खात्यातील पैसे निघेनामाझ्या खात्यातून थमद्वारे पैसे निघत नसल्याने करमाड येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलो असता आपले पीक कर्ज थकीत आहे. कर्ज व व्याज भरा. भरलेली रक्कम व्याज कपात करून बाकी रक्कम दोन दिवसात खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. माझे कर्ज दोन वर्षांपासून थकीत आहे. कर्जमाफी मिळेल अशी आशा होती. परंतु कर्ज माफ तर झालेच नाही, उलट खात्यात जमा असलेले पैसे मिळाले नाहीत.- बाबासाहेब भीमराव पवार, लाडसावंगी शेतकरी

कार्यालयात संपर्क कराआम्ही पीक कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले नाही. तसा आदेश अद्याप आला नाही. वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधावा.- विवेक व्यवहारे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र

खाते तपासणी करून सांगतोअद्याप पीक कर्ज प्रकरणी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावले नाही. थकीत कर्ज एक- दोन वर्षे झाली असेल तर बँक सिस्टीममध्ये होल्ड लागू शकतो. शुक्रवारी खाते तपासणी करून कळवतो - विवेक राठोड, मुख्य शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे काढता आले नाहीमी लाडसावंगी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून दोन वर्षांपूर्वी ६० हजार रुपये पीक कर्ज घेतले होते. मात्र दोन वर्षांपासून पीक कर्ज थकलेले आहे. माझ्या मुलाच्या हाताचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी खात्यातील पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघाले नाहीत. विचारपूस केली असता खाते होल्ड केले असल्याचे सांगितल्याने मुलाची शस्त्रक्रिया करता आली नाही.- लताबाई बापुराव नाईक, शेतकरी, लाडसावंगी

टॅग्स :Crop Loanपीक कर्जAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर