पावसाने दाडी मारल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल
By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:07:16+5:302014-06-25T01:05:49+5:30
जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत.

पावसाने दाडी मारल्याने शेतकरी, व्यापारी हवालदिल
जालना: जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर बाजारपेठेत मालाची आवक कमी झाल्याने व्यापारीही हतबल झाले आहेत.
यंदा चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, अद्यापपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झालेली आहे. पेरणीसाठी सर्व तयारी करून शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने बाजारपेठेवर त्याचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारी मात्र, कमालीचा शुकशुकाट दिसून आला.नवीन मोंढ्यात मागील आठ दिवसापासून मालाची आवक कमालीची घटली असल्याचे येथील काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारपेठेत सध्या गहू, ज्वारी, हरभरा आदी मालाचीच आवक आहे. लोकवन गव्हाची आवक दररोज २०४ ्िक्वंटल असून १४०० ते १५८६ आहेत. ज्वारी ३०० ते ४०० क्विंटल असून भाव ११०० ते २७०० रूपये आहेत. बाजरी ४० क्विंटल आवक असून भाव १३०० ते १४०० आहेत. हरभरा २४७ क्विंटल आवक असून दर १८००ते २३८१ रूपये आहेत. सोयाबीन ८९ क्विंटल आवक असून भाव ३८०० ते ३९०० आहे.
सध्या लिंबोळीचा हंगाम सुरू असतानाही आवक कमी आहे. सध्या लिंबोळीची आवक दररोज ७८ क्विंटल असून भाव ६०० ते ७५० रूपये आहे.
मक्याची आवक दररोज ३०० पोते इतकी असून शंभर रूपयाची तेजी आल्यानंतर भाव ११७५ ते १३५० रूपये प्रतिक्विंटल आहे. साबुदाण्याच्या दरात १०० रूपयांची तेजी आली असून भाव ६००० ते ६८०० रूपये प्रतिक्विंटल आहे. साखरेच्या दरात थोडी तेजी आल्यानंतर भाव ३१०० ते ३२०० रूपये प्रतिक्ंिवटल आहेत. सर्व प्रकारच्या तेलामध्ये १ ते २ रूपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, विविध मालांच्या दरात वाढ होत असल्यामुळे त्याची झळ सामान्य नागरिकांना बसत आहे. (प्रतिनिधी)
जनावरांच्या बाजारात मोठी गर्दी
जालन्यात दर मंगळवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारात मात्र गर्दी दिसून आली. परिसरातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी आणली होती. बाजारात जनावरे खरेदी करणाऱ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. पाऊस न पडल्याने जनावरांच्या किंमती नियमित भावापेक्षा कमी होतात. हीच बाब हेरून परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. जनावरे पाहून दर ठरविले जातात. या बाजारात गाय, बैल, म्हैस, बकऱ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, अपेक्षित किंमत न आल्याने काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे परत नेली.