शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

शेतकरी तरुणांना लग्नासाठी लावला जातोय लाखोंचा चुना; फसवणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:44 IST

काही तरुणांनी समाजाच्या दबावाखाली आणि कुटुंबाच्या आग्रहाखातर दलालांमार्फत मुली आणून लग्न केले. पण, काही महिन्यांतच वधूने पोबारा केल्याच्याही घटना घडल्या.

- प्राची पाटील

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रत्येक लहान गावातही लग्न रखडलेले किमान ५० शेतकरी तरुण आहेत. अनेक ठिकाणी लग्नासाठी ‘विकत’ मुली आणण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच शेतकऱ्यांना लग्नाच्या नावाने लाखोंचा गंडा घातला जात आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपबिती सांगितली. लग्नाळू शेतकरी तरुणांचे विवाह आणि त्यातून निर्माण झालेल्या दलालीच्या या बाजारात नात्यांचा आधार प्रेम नव्हे, तर फक्त पैसा आहे.

काही तरुणांनी समाजाच्या दबावाखाली आणि कुटुंबाच्या आग्रहाखातर दलालांमार्फत मुली आणून लग्न केले. पण, काही महिन्यांतच वधूने पोबारा केल्याच्याही घटना घडल्या. नोकरी करणाऱ्यांना लग्नाच्या बाजारात अधिक भाव आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करून मुलगी मिळत नसल्याने अनेक जण दलालांच्या या जाळ्यात सहज फसत आहेत. अनेक दलाल बिहार, झारखंड, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतून मुलींना पैसे देऊन आणतात. लग्न ठरवण्यासाठी ३ ते १० लाखांपर्यंत रक्कम घेतात. बनावट कागदपत्रे वापरून लग्न होते आणि काही दिवसांत नवरी आणि एजंटही गायब होतात. या व्यवहारात कोणताही पुरावा नसल्याने तक्रार करतानाही अडचणी येतात.

केस १ -३० वर्षीय बबलूला (नाव बदलले आहे.) शेतीमुळे गावातच काय, दूर-दूरही मुलगी मिळत नव्हती. त्यांना धुळ्यातील एकाने स्थळ दाखवले. त्या बदल्यात २ लाख देण्यात आले. पुढे यात शामराव आणि दीपिका या व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रमात लग्नासाठी खूप मुली असल्याचे सांगत त्यांच्याकडून ३ लाख उकळले. मात्र, पुन्हा त्या दोघांचा फोन कधीच लागला नाही. नंतर एका वेगळ्या दलालामार्फत त्यांनी २ लाख देऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलीशी लग्न केले. मात्र ७-८ महिन्यांतच या मुलीनेही सुंबाल्या केला.

केस २-२८ वर्षीय अनिल (नाव बदलले आहे.) याने लग्नासाठी मध्यस्थामार्फत पावरी समाजातील मुलगी निवडली. अडीच लाखांमध्ये सौदा झाला. मुलीच्या गावातील एका जंगलात असलेल्या महादेव मंदिरात साध्या पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर पहिल्यांदा मुलीने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. पतीही तिच्यासोबत गेला, मात्र रस्त्यातच पतीला चकवा देत मुलगी निसटली. त्यानंतर ते कुटुंब पुन्हा कधीही त्यांना त्या गावात दिसले नाही.

पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुली द्याव्यातशेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून मुली नोकरदारांची निवड करत आहेत. पुढाऱ्यांनी आपल्या मुली शेतकऱ्यांना द्याव्यात. म्हणजे, समाजात चांगला पायंडा पडेल. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही खात्री करूनच मुलीची निवड करावी.- विजय काकडे, मुख्य समन्वयक, भारत क्रांती मिशन

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीmarriageलग्न