पळसवाडीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By | Updated: December 3, 2020 04:11 IST2020-12-03T04:11:02+5:302020-12-03T04:11:02+5:30
कैलास ठेंगडे हे रविवारी रात्री ते मुलगा विक्की व विक्कीच्या मित्रासह गल्ले बोरगाव शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले ...

पळसवाडीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कैलास ठेंगडे हे रविवारी रात्री ते मुलगा विक्की व विक्कीच्या मित्रासह गल्ले बोरगाव शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांनी पिकाला पाणी दिले. मुले उठल्यानंतर शेजारी पंपावर चहा पिऊन या, असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत मी गायीला पाहून येतो, असे ते म्हणाले. विक्की व त्याचा मित्र चहा पिण्यासाठी गेल्यानंतर थोड्या वेळाने कैलास यांनाही चहा पिण्यासाठी त्यांनी फोन लावला. मात्र, बराच वेळ रिंग वाजूनही फोन न उचलल्याने दोघेही शेतात आले, तेव्हा त्यांना कैलास यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला लटकलेला दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी शेतकऱ्यांनी धाव घेतली. या घटनेची माहिती खुलताबाद पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोनि. सीताराम मेहेत्रे, बीट जमादार राम छत्रे, वाल्मीक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह झाडाखाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला. सुस्वभावी कैलास यांनी आत्महत्या का केली, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास बीट जमादार राम छत्रे, वाल्मीक कांबळे करीत आहेत.
फोटो आहे.