प्रल्हाद मोदींसमोर नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:42 IST2018-12-04T23:42:13+5:302018-12-04T23:42:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.

False criticism on Narendra Modi before Prahlad Modi | प्रल्हाद मोदींसमोर नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

प्रल्हाद मोदींसमोर नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार व शिधापत्रिकाधारकांचा मोर्चा




जाहीर सभेचा बनला राजकीय आखाडा :
प्रल्हाद मोदी-अब्दुल सत्तार यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी
सत्तार तावातावात निधून गेले सभेतून
‘विषयावर’ बोला असे बजावले एका प्रेक्षकाने!
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या समोरच आज नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका होत होती आणि ती प्रल्हाद मोदी यांना ऐकून घ्यावी लागली.
‘डीबीटी रद्द करा, पैसे नको, धान्य हवे,’ अशा घोषणा देत आज दुपारी औरंगाबाद जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक व शिधापत्रिकाधारकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौकापासून सुरू झालेला हा मोर्चा आमखास मैदानावर सभेत रूपांतरित झाला. एका उघड्या जीपमध्ये उभे राहून प्रल्हाद मोदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. समवेत अन्य पदाधिकारीही होते. पंतप्रधानांचे भाऊच मोर्चात असल्याने पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता.
मोर्चातच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या होत्या. आमखास मैदानावरील जाहीर सभेत तर राजकीय जुगलबंदीच बघायला मिळाली आणि तीही प्रल्हाद मोदी व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यात!
त्याचे असे झाले की, शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव विलास भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या वतीने संतोष माने व जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या वतीने कृष्णा पाटील डोणागावकर हे या सभेत मंचावर बसले होते. त्यांची भाषणेही झाली. दरम्यान खा. चंद्रकांत खैरे यांचा जाहीर पाठिंबा मोबाईलद्वारे ऐकवण्याचा प्रयत्न झाला; पण तो अयशस्वी ठरला.
‘वो सरकार निकम्मी है... वो सरकार बदलनी है...’ चौकट
नागपूरचे आर. एस. अंबुलकर यांनी सर्व राजकीय पक्षांनी डीबीटीचा प्रश्न हाताळावा, असे आवाहन करीत ‘वापस लो वासप लो... डीबीटी वापस लो’, ‘रेशन आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं’, ‘रोजी रोटी दे न सकी, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है,’ अशा घोषणा दिल्या व त्या उपस्थितांकडून वदवून घेतल्या.
सभा सुरू होताच एक महिला स्टेजजवळ आली आणि म्हणाली, ‘आधी पुड्या बंद करा. कॅन्सर होऊन पोरं मरायला लागली;’ पण तिचे म्हणणे कुणी विचारातच घेतले नाही. सविता मोकळे या कार्डधारक महिलेचे भाषण मोठे रंजक झाले. तिनेही नरेंद्र मोदी यांचे नाव घेत टीका केली. डीबीटी लागू झाल्यास रेशनवर गहू २० रुपये किलो व तांदूळ २७ रुपये किलो अशा चढ्या भावाने विकले जाणार असल्याचा इशारा डी.एन. पाटील यांनी यावेळी दिला, तर रॉकेल ६२ रुपयांनी विकले जाणार आहे. एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

Web Title: False criticism on Narendra Modi before Prahlad Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.