हरभर्याच्या किमान दराला घसरण
By Admin | Updated: May 19, 2014 01:06 IST2014-05-19T00:28:50+5:302014-05-19T01:06:26+5:30
लातूर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभर्याच्या किमान दरात घसरण झाली आहे़ परिणामी त्याचा शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे़

हरभर्याच्या किमान दराला घसरण
लातूर : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभर्याच्या किमान दरात घसरण झाली आहे़ परिणामी त्याचा शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे़ हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने हा परिणाम जाणवत आहे़ त्यामुळे शेतकर्यांतून नाराजी व्यक्त होत आहे़ शेतीमालास योग्य भाव मिळावा तसेच शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हमीभाव जाहीर करुन तूर व हरभरा खरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या़ त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडने फेब्रुवारीपासून लातूरसह अहमदपूर, उदगीर आणि औसा या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु केले होते़ हे खरेदी केंद्र १० मेपर्यंत सुरु राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ त्याप्रमाणे चार ठिकाणी हरभर्याची खरेदी करण्यात आली़ मुदत संपल्याने हमीभाव खरेदी केंद्राला टाळे लावण्यात आले़ हे खरेदी केंद्र सुरु राहिलेल्या कालावधीत शेतकर्यांच्या हरभर्यास लातुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण भाव २८०० ते २९०० रुपये असा मिळत राहिला़ तसेच किमान भावही २४०० रुपयांपेक्षा जास्त होता़ हमीभाव केंद्र बंद झाल्यानंतरच्या कालावधीपासून बाजार समितीत हरभर्याच्या किमान दरात घसरण झाली असल्याचे पहावयास मिळत आहे़ १० मे रोजी किमान भाव २ हजार ३००, १२ मे रोजी २ हजार ३००, १५ मे रोजी २ हजार ७५ तर १७ मे रोजी २ हजार २६१ रुपये किमान दर मिळाला आहे़ त्याचबरोबर कमाल दरातही घसरण झालेली दिसून येत आहे़ वास्तविक पहाता, यंदा जिल्ह्यात हरभर्याचे उत्पन्न वाढले आहे़ फेब्रुवारी- मार्च महिन्यात गारपीट झाल्याने बहुतांशी शेतकर्यांचे नुकसान झाले़ या नुकसानीतून बचावलेले उत्पन्न पदरात पाडून घेण्यासाठी राशीही खोळंबल्या होत्या़ उशिरा राशी झाल्याने शेतकर्यांना हमीकेंद्राचा लाभही घेता आला नाही़ केंद्र बंद झाल्याने शेतकर्यांना बाजार समितीत हरभरा आणावा लागत आहे़ परंतु, किमान दरात मात्र मोठी घसरण होत आहे़ (प्रतिनिधी) आवक चांगली़़़ हरभर्यास चांगल्यापैकी भाव मिळत आहे़ गारपिटीमुळे निकृष्ट दर्जाचा माल आल्याने त्याला दरही कमी मिळाला असेल़ सर्वसाधारण भाव चांगला असून आवकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आडत व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले़