"शरद पवार यांच्या पुस्तकात स्वतःबद्दल काय लिहिले हे देखील फडणवीसांनी वाचून दाखवावं"
By शिवराज बिचेवार | Updated: May 19, 2023 12:54 IST2023-05-19T12:50:45+5:302023-05-19T12:54:43+5:30
लोकसभेच्या जिंकलेल्या 19 जागा आमच्याकडे राहतील

"शरद पवार यांच्या पुस्तकात स्वतःबद्दल काय लिहिले हे देखील फडणवीसांनी वाचून दाखवावं"
नांदेड- फडणवीस यांनी ठाकरे यांच्याबद्दल शरद पवार यांच्या पुस्तकात काय लिहिले ते वाचून दाखविले, परंतु स्वतः बद्दल काय लिहिले ते ही वाचून दाखवावे, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी आज केले.
राऊत म्हणाले, लोकसभेच्या आम्ही 19 जागा जिंकल्या, त्यामुळे त्या आमच्याकडे राहतील. राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या, काँग्रेसने एकमेव जागा जिंकली. त्यामुळे या जागेवर चर्चा कशी करणार? 19 जागा ही मागणी नसून त्या आमच्याच आहेत. जागा वाटपाचा जो 16-16-16 फॉर्म्युला आहे तो चुकीचा आहे, असा खुलासाही खा. राऊत यांनी केला.
तसेच खोके सरकारला आमच्याबद्दल काय बोलायचं ते बोलू द्या, महाविकास आघाडी मजबूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढणार अन त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. असेही राऊत म्हणाले. दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवीत, राऊत म्हणाले, अंधारे या उपनेत्या आहेत, या घटनेतील दोषींची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.