वीज ग्राहकांवर अतिरिक्त भार

By Admin | Published: December 30, 2014 12:56 AM2014-12-30T00:56:15+5:302014-12-30T00:56:15+5:30

औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीज ग्राहकांकडून एलबीटीसोबत अतिरिक्त भार वसूल केला जात आहे. ग्राहकांना शंभर ते दोन हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आकार भरावा लागत आहे

Extra loads on power consumers | वीज ग्राहकांवर अतिरिक्त भार

वीज ग्राहकांवर अतिरिक्त भार

googlenewsNext


औरंगाबाद : महावितरणने शहरातील वीज ग्राहकांकडून एलबीटीसोबत अतिरिक्त भार वसूल केला जात आहे. ग्राहकांना शंभर ते दोन हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त आकार भरावा लागत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडला आहे. त्यामुळे जीटीएलनंतर महावितरणही ग्राहकांची लूट करीत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
महावितरणने शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. वीजपुरवठ्याचा ताबा घेण्यापूर्वी जीटीएलला ग्राहकांकडून एलबीटी वसूल करण्याचे आदेश महावितरणने दिले. त्या आदेशाप्रमाणे एकूण वीज बिलावर ग्राहकांकडून २ टक्के एलबीटी वसूल केली जात आहे. त्यामुळे काही ग्राहकांना महिन्याला हजारो रुपयांचा एलबीटी भरावा लागत आहे.
विशेष म्हणजे वसूल केलेला एलबीटी महापालिकेकडे भरला जात नाही. त्यामध्ये महावितरणकडून अतिरिक्त भार ग्राहकांवर लादला जात आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर बिलाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. ग्राहकांकडून वर्षात एकवेळ अतिरिक्त आकार वसूल केला जातो. तो जीटीएलने केल्यानंतर महावितरणकडून मनमानी करून ग्राहकांकडून अतिरिक्त आकार वसूल केला जात आहे.
महावितरणच्या मनमानी कारभाराचा आर्थिक फटका २ लाख ४५ हजार वीज ग्राहकांना बसत आहे. अधिकाऱ्यांनी मनमानी थांबवावी, ही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Extra loads on power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.