शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

प्रयोगशील शाळा : अल्पावधीतच कात टाकत शाळेची प्रयोगशीलतेतून गुणवत्तेकडे झेप...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:08 PM

प्रयोगशीलतेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे देण्याच्या सादेला पालकांचा प्रतिसाद

ठळक मुद्देपालक जागृती करून शाळेला तब्बल ७५ हजार रुपये लोकवर्गणीविद्यार्थ्यांची १०० टक्के  उपस्थिती

- मुबीन पटेल

पिशोर (औरंगाबाद ) : कन्नड तालुक्यातील आमदाबाद जि.प. शाळेने अल्पावधीतच कात टाकून गुणवत्तेकडे झेप घेतली आहे. प्रयोगशीलतेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे देण्याच्या सादेला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने  ही शाळा तालुक्यातील प्रयोगशील शाळेमध्ये अग्रेसर आहे.

आमदाबाद गावात साधारणत: १९६२ मध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली.  पूर्वी गावात असलेल्या शाळेला युवा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून छोटी, पण रोडलगत जागा व नवीन इमारत मिळाली. सध्याच्या युगात खासगी व इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले असताना लोकसहभाग, शिक्षकांचे प्रयत्न, जागरूक पालक, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य यांच्या समन्वयातून अल्पावधीतच कोणत्याही स्पर्धेत टिकण्यास सक्षम अशी सुसज्ज व कॉर्पोरेट शाळा आमदाबाद गावात उभी राहिली.

२०१४ मध्ये शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालक जागृती करून शाळेला तब्बल ७५ हजार रुपये लोकवर्गणी मिळवून दिली. यातून येथे सुसज्ज ध्वनी व्यवस्थेसह बिग स्क्रिन प्रोजेक्टर व डिजिटल वर्ग साकारण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनातून मिळालेली रक्कम वापरून पूर्ण शाळेचे विद्युतीकरण,  पंख्यांची व्यवस्था झाली.  ग्रामपंचायतीने  १४ व्या वित्त आयोगातून दोन एलईडी, एक संगणक संच व वॉटर फिल्टर शाळेला भेट दिल्याने  सुविधांमध्ये भर पडली. यामुळे  प्रयोग करणे सोयीचे झाले आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी सिद्दीकी, पं.स. सदस्या नंदाबाई बनकर, विस्तार अधिकारी कल्पना पदकोंडे व केंद्रप्रमुख डी. टी. शिंदे यांचे मार्गदर्शन नेहमी असते.

विद्यार्थ्यांची १०० टक्के  उपस्थितीपहिली ते सातवीपर्यंत येथे वर्ग असून, आजघडीला शाळेची पटसंख्या ११२ असून, यात ५७ मुले व ५५ मुलींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे यातील तब्बल २० मुले ही आमदाबादबाहेरील असून, त्यांनी खाजगी शाळांमधील प्रवेश रद्द करून जिल्हा परिषद शाळेची निवड केली आहे. विद्यार्थ्यांची १०० टक्के  उपस्थिती असते, हे विशेष आहे.

शाळेचे भविष्यातील उपक्रम- सर्व वर्गखोल्या डिजिटल करणे, निधी मिळाल्यास संगणक लॅब स्थापन करणे.- अप्रगत विद्यार्थीमुक्त शाळेचा दर्जा टिकविणे, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम राबविण्याची पात्रता प्राप्त करणे. - ‘तेजस’ हा  प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने इंग्रजी विषयाची चांगली सोय झाली असून यापुढे असे नवनवीन प्रयोग करुन शाळेचा निकाल १०० टक्के लावणार.

पालक काय म्हणतात?- शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे प्राथमिक शाळा. बदलाची सुरुवात येथूनच व्हावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम फळाला आले. शाळेत नवनवीन प्रयोग राबविल्याने मुलांना शाळेची गोडी लागली आहे. ती कायम राहावी. -छायाबाई पवार- माझा मुलगा पूर्वी औरंगाबाद येथील एका नामांकित शाळेत शिकत होता. परंतु खर्चाच्या तुलनेत अपेक्षित परिणाम न मिळाल्याने मी त्याचा प्रवेश आमदाबाद शाळेत घेतला. त्याची प्रगती बघून मला माझा निर्णय योग्य ठरल्याचे समाधान आहे.  - संदीप घडमोडे

जिल्हा परिषद शाळा ही केवळ गरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी शाळा नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पहिला व एकमेव पर्याय आहे आणि हेच सिद्ध करण्याच्या दृष्टीने आमचा सदैव प्रयत्न असेल.- राजू सांडू बनकर,शालेय समिती अध्यक्ष

एका प्रयोगशील शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ग्रामस्थ व सर्व सहकारी यांच्या सहयोगातून शाळेला जिल्ह्यातील आदर्श शाळांच्या पंक्तीत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.- कमलाकर सुरडकर,मुख्याध्यापक 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक