दक्षिण मध्य रेल्वेचे प्रयोग सुरूच

By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T00:44:51+5:302014-06-27T01:02:57+5:30

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेकडून औरंगाबाद- तिरुपती- औरंगाबाद विशेष रेल्वे एक ते दोन दिवसआधी जाहीर करण्याचा प्रयोग गेल्या दीड महिन्यापासून अनुभवास येत आहे.

Experiment of South Central Railway | दक्षिण मध्य रेल्वेचे प्रयोग सुरूच

दक्षिण मध्य रेल्वेचे प्रयोग सुरूच

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेकडून औरंगाबाद- तिरुपती- औरंगाबाद विशेष रेल्वे एक ते दोन दिवसआधी जाहीर करण्याचा प्रयोग गेल्या दीड महिन्यापासून अनुभवास येत आहे. ही विशेष रेल्वे त्यामुळे रिकाम्या बोगी घेऊन रवाना होताना दिसली, तरीही गुरुवारी पुन्हा एकदा प्रवासाच्या एक दिवसआधी ही विशेष रेल्वे जाहीर करण्यात आली.
दक्षिण मध्य रेल्वेकडून औरंगाबाद- तिरुपती- औरंगाबाद विशेष रेल्वेच्या तीन फेऱ्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. यानुसार २७ जून, ४ जुलै आणि ११ जुलै रोजी ही रेल्वे औरंगाबाद येथून दुपारी ३ वाजता सुटेल. जालना, परभणी, नांदेड, निझामाबाद, सिंकदराबादमार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे तिरुपती येथून २८ जून, ५ जुलै आणि १२ जुलै रोजी सायंकाळी ५.१० वाजता निघेल. औरंगाबाद येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता पोहोचेल. औरंगाबाद- तिरुपती विशेष रेल्वे ही दक्षिण मध्य रेल्वेकडून बंद करण्यात आली होती; परंतु उन्हाळी हंगामातील वाढणाऱ्या प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेतर्फे या विशेष रेल्वेची घोषणा करण्यात आली.
गुरुवारी या गाडीच्या तीन फेऱ्या वाढविल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये २७ जून रोजी ही विशेष रेल्वे जाहीर करण्यात आली.
रिकाम्या बोगी रवाना
यापूर्वी एक दिवसआधी घोषणा केल्यामुळे १६ मे रोजी ही विशेष रेल्वे जवळपास ५० टक्के रिकाम्या बोगी घेऊन रवाना झाली होती.
औरंगाबाद- तिरुपती विशेष रेल्वे
रवाना तारीख जाहीर तारीख
१६ मे१५ मे
२३ मे२० मे
३० मे २८ मे
६ जून ४ जून
१३ व २० जून९ जून

Web Title: Experiment of South Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.