शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा; धरणे मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:41 IST

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देआता टंचाईचे नियोजन शासनाकडे७३ लघु प्रकल्प कोरडेठाक

औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रकल्पांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. जून महिना संपला; परंतु या २३ दिवसांत प्रकल्प क्षेत्रांत पाऊस न झाल्यामुळे ते प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी हे मोठे धरण असून, ते सध्या मृतसाठ्यात आहे. या वर्षी धरण क्षेत्रात फार कमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत ११२ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता. 

जिल्ह्यात मध्यम प्रकल्प १६ आहेत. त्या प्रकल्पात सद्य:स्थितीत शून्य टक्का पाणीसाठा आहे. २०५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता त्या प्रकल्पांत आहे. मध्यम प्रकल्पांत सुखना, लहुकी, गिरिजा, वाकोद, खेळणा, अजिंठा अंधारी, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, ढेकू, कोल्ही, नारंगी, बोरदहेगाव यांचा समावेश आहे. ३० जून रोजी या प्रकल्पांच्या हद्दीत शून्य टक्का पाऊस झाला आहे. यातील १२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४ प्रकल्प जोत्याच्या खाली आहेत. जिल्ह्यात १,३७२ गावे आहेत. त्यापैकी ७४३ गावे आणि २३८ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा आहे. १,०६४ टँकर सध्या सुरू असून, १९ लाख २३ हजार ६३४ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५३२ विहिरी प्रशासने अधिग्रहित केलेल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईच्या नियोजनासाठी वाढीव अनुदानाची गरज पडू शकते. 

७३ लघु प्रकल्प कोरडेठाक९३ लघु प्रकल्पांतील ७३ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ११ प्रकल्पांत जोत्याखाली पाणी आहे. ९ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. ९३ लघु प्रकल्पांत सध्या फक्त १ टक्का पाणी शिल्लक आहे. १८८ दशलक्ष घनमीटर पाणी सध्या त्या प्रकल्पांत असून, सदरील प्रकल्पांत गेल्या वर्षी ७.१४ टक्के पाणी होते.

आता टंचाईचे नियोजन शासनाकडेटंचाईचे नियोजन आता शासनाच्या अखत्यारीत जाणार आहे. दर तीन महिन्यांच्या नियोजनानुसार जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. ३० जूनपर्यंत टंचाईचे नियोजन होते. तसेच नवीन अध्यादेशानुसार टंचाई, आपत्ती नियोजनावर काम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पेरण्यांचा टक्का घसरला आहे. प्रकल्पातही कमी पाणीसाठा आहे. याचा प्रशासन आढावा घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ७ लाख हेक्टरच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा जिल्ह्यात आहे. खरीप पेरणीचे अहवाल घेतले जात आहेत. त्यानुसार प्रशासन नियोजन करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :RainपाऊसJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद