परळीतील गुंडप्रवृत्तीचे तीन सख्खे भाऊ बीड जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:25 IST2019-04-30T16:23:11+5:302019-04-30T16:25:03+5:30
धनराज, गोविंद व गणेश उमाजी गित्ते (सर्व रा.चांदापूर ता.परळी) अशी हद्दपार केलेल्या गुंड भावंडांची नावे आहेत.

परळीतील गुंडप्रवृत्तीचे तीन सख्खे भाऊ बीड जिल्ह्यातून हद्दपार
बीड : गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या परळी तालुक्यातील चांदापूर येथील तीन गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी दुपारी हे आदेश काढले. विशेष म्हणजे हे तिनही गुंड नात्याने सख्खे भाऊ आहेत.
धनराज, गोविंद व गणेश उमाजी गित्ते (सर्व रा.चांदापूर ता.परळी) अशी हद्दपार केलेल्या गुंड भावंडांची नावे आहेत. या भावंडांनी परळी शहरात दहशत माजविली होती. जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापती करणे व इतर शरिराविरूद्धचे गंभीर गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल होती. हाच धागा पकडून परळी शहर ठाण्याचे पोनि देविदास शेळके यांनी त्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. उपअधीक्षक अशोक आम्ले यांनी चौकशी करून पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला. स्थागुशाचे पोनि घनश्याम पाळवदे यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी या तिघांनाही बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले.