दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली
By Admin | Updated: November 26, 2014 01:09 IST2014-11-26T00:36:32+5:302014-11-26T01:09:24+5:30
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून,

दररोज येताहेत प्रस्ताव... टँकरची मागणी वाढली
लातूर : लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे़ जिल्ह्यातील ९५ गावांत पाणीटंचाईचे सावट आहे़ यापैकी ३५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असून, त्यापैकी केवळ १८ गावांच्या अधिग्रहणाला मंजुरी देण्यात आली आहे़ तरी एकूण ६ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे़ दरम्यान प्रशासनाने २ गावांना २ टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे़ त्यात औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ गावचा समावेश आहे़
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, अधिग्रहण, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती, पूरक नळ योजना, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी उपाययोजनांचे नियोजन केले आहे़ जशी मागणी येईल, त्यानुसार प्रस्ताव घेण्यात येत आहे़ जिल्ह्यातील गावे व वाडी तांडे मिळून ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली आहे़ त्यातील ३५ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले असून, त्यातील १८ प्रस्ताव मंजूरही झाले आहेत़ तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर तालुक्यातील १, औसा तालुक्यातील २ व अहमदपूर तालुक्यातील ३ अशा एकूण ६ गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत़ औसा तालुक्यातील १ व अहमदपूर तालुक्यातील १ अशा २ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ लातूर तालुक्यातील १५, औसा तालुक्यातील ३७, निलंगा तालुक्यातील २०, रेणापूर तालुक्यातील ६, अहमदपूर तालुक्यातील १४, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील २ व जळकोट तालुक्यातील १ अशा एकूण ९५ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली़ त्यापैकी लातूर तालुक्यातील ७, औसा तालुक्यातील ६, निलंगा तालुक्यातील ३, अहमदपूर तालुक्यातील २ अशा एकूण १८ गावांतील अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली़ (प्रतिनिधी)४
टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी जोर धरु लागली असून, दररोज या मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ मंगळवारीच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात लातूर तालुक्यातील ३, औसा तालुक्यातील २, अहमदपूर तालुक्यातील ४ अशा एकूण ९ गावांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे़ गाव, वाडी-तांड्यावरुन मागणीचे प्रस्ताव येत आहेत़ प्रशासनाकडूनही उपलब्ध पाणी अधिग्रहण केले जात असून, स्वतंत्र टंचाई निवारण कक्ष तयार करण्यात आला आहे़ सध्या विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यावर भर असून कृती आराखड्यानुसार पूरक नळयोजना, नळयोजनांची दुरुस्ती, नव्या विंधन विहिरी आदी कामांचे प्रस्तावही घेतले जात आहेत़