शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय भुकंपातही राष्ट्रवादी सुसाट; शिवसेना,कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 15:47 IST

ही राजकीय उलथापालथ पैठण तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आहे.

पैठण (औरंगाबाद): राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असताना पैठण मतदारसंघातील शिवसेनेचे बाजारसमितीचे संचालक, जि.प सदस्या शिल्पा कापसे यांचे पती ज्ञानेश्वर कापसे आणि काँग्रेसचे नगर परिषद गटनेते हसन्नोद्दीन कटयारे यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांची उपस्थिती होती. 

ही राजकीय उलथापालथ पैठण तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी देणारी आहे.  जिल्हा परिषद व नगरपरीषद निवडणुकीच्या तोडावर आपेगाव जि.प. सदस्य असलेल्या शिल्पा कापसे यांचे पती  ज्ञानेश्वर कापसे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. बिडकीनचे जि.प. सदस्य विजय चव्हाण यांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर कापसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या तिकीटावर ज्ञानेश्वर कापसे यांनी गत निवडणुकीत पत्नीस निवडून आणले होते. यंदाही याच गटातून निवडणूक लढवायची त्यांची ईच्छा आहे. परंतु, अलिकडे त्यांना पक्षातून चांगली वागणूक मिळत नसल्याने ते नाराज होतो. या नाराजीतूनच त्यांनी  शिवसेनेला जयमहाराष्ट् केला.  

कॉंग्रेसचे गटनेते कटयारे राष्ट्रवादीतपैठण नगर परीषदेचे गटनेते तथा काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष हसन्नोद्दीन कटयारे यांनी देखील काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. हसनोद्दीन कटयारे यांच्या प्रवेशाने शहरात कमकुवत झालेल्या कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. हसनोद्दीन कटयारे यांना जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी पैठण शहराध्यक्ष पदावर नियुक्त केले होते. दरम्यान, प्रदेश कॉंग्रेसवर वर्णी लागताच माजी मंत्री अनील पटेल यांनी शहराध्यक्ष पदावर त्यांचे पुत्र निमेश पटेल यांची निवड केली. शहराध्यक्ष पदाचा हा वाद विकोपाला गेला होता शेवटी हसनोद्दीन कटयारे यांना हे पद सोडावे लागले. यामुळे ते नाराज होते व याच नाराजीतून त्यांनी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्ष प्रवेशावेळी दत्ता गोर्डे, आप्पासाहेब निर्मळ, अनील घोडके, विजय चव्हाण, आप्पासाहेब गायकवाड, गौतम बनकर,  ज्ञानेश वाघ, कैलास चव्हाण, समद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ