शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

सोने पळविल्याचे समजल्यानंतरही व्यवस्थापकावर का ठेवला विश्वास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 7:04 PM

आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी तब्बल सहा महिने का लावले, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

ठळक मुद्देविश्वनाथ पेठे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दुकानाला भेट दिली तेव्हाच चोरी उघडकीस जैन कुटुंबास दुकानात प्रत्यक्ष बोलावून घेत दागिन्याविषयी विचारले होते.

औरंगाबाद : व्यवस्थापक अंकुर राणे याने विश्वासघात करून दुकानातील ५८ किलो सोन्याचे दागिने ग्राहक राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना दिल्याचे सुवर्णपेढीचे भागीदार मालक विश्वनाथ पेठे यांना गतवर्षी डिसेंबर महिन्यातच समजले होते. पेठे यांनी आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी तब्बल सहा महिने का लावले, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सचे भागीदार विश्वनाथ पेठे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दुकानाला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी दुकानातील हिशेब आणि स्टॉक मालाची तपासणी केली असता ५८ किलो सोन्याचे दागिने कमी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी राणेकडे चौकशीही केली.हे दागिने ग्राहक राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना दिल्याचे त्याने सांगितले होते. त्यावरून जैन कुटुंबास दुकानात प्रत्यक्ष बोलावून घेत त्यांनी नेलेल्या दागिन्याविषयी विचारले होते. त्यांनी लवकरच सोने आणून देतो, असे सांगितल्याचे विश्वनाथ पेठे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस विविधागांनी तपास करीत आहेत. 

औरंगाबादेतील वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ५८ किलो सोन्यावर नोकरानेच घातला दरोडा

दाखविण्यासाठी घरी दिले ५८ किलो सोन्याचे दागिने सुवर्णपेढीतून ग्राहकांना दागिने दाखविण्यासाठी दिले जात नाहीत, असा दुकानाचा नियम आहे. तरीही जैन कुटुंबियांना दाखविण्यासाठी दिलेला ५८ किलोचे सुवर्णलंकार त्यांनी परत आणून दिले नसल्याचे राणे याने पेठे यांना सांगितले होते. त्याच्या सांगण्यावर दुकानमालकांनी विश्वास कसा ठेवला?दुकानातून एवढे मोठे दागिने दाखविण्यास दिले गेले असावे, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. नियम मोडून विश्वासघाताने दुकानाबाहेर दागिने पाठविणाऱ्या राणेकडे एप्रिल महिन्यात त्या दागिन्याविषयी विचारणा करण्यात आली आणि २० मे रोजी पोलिसांत तक्रार देण्यात आली.

अशी केली दोन वर्षांत ५८ किलो सोन्याची हेराफेरी

तिघांना मिळाली पोलीस कोठडीयेथील वामन हरी पेठे या सुवर्णपेढीतून ५८ किलो सोने लांबविल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले अंकुर राणे, राजेंद्र जैन आणि लोकेश जैन या तिघांना गुरुवारी (दि.४ जुलै) मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए. मोटे यांनी ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :theftचोरीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटकGoldसोनं