तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत वीज ग्राहकांना अचूक वीज बिल मिळावे, वीज चोरीस आळा बसावा, यासाठी १५०० मिटर नव्याने बसविण्यात आले. मात्र विजेचे बील जुन्याच मिटरच्या रिडींगआधारे दिली जात असून, यामुळे प्रत्यक्षात विजेचा वापर व बिलावरील देयक यात मोठी तफावत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत चार वीज उपकेंद्र आहेत. २२ गावातील जवळपास ८ ते १० हजार वीज ग्राहक आहेत. ८ महिन्यापूर्वी तत्कालीन कनिष्ठ अभियंता राजेंद्र पाठक यांनी ग्राहकांना अचूक वीज बील मिळावे, विजेची गळती रोखावी, चोरीला आळा बसावा यासाठी १५०० ग्राहकांना नव्याने अत्याधुनिक वीज मिटर बसविले. पण घरातील मिटर दारावर आणले. कुलूपबंद घर याचा होणारा गवगवा यातून वीज मिटर रिडींग घेण्यास अडचण येवू नये, यासाठी उपाययोजना केल्या. पण आठ महिन्यानंतरही माळुंब्रा वीज केंद्रातील ग्राहकांना जुन्याच मिटरच्या रिडींगप्रमाणे वीज बिल दिले जाते. सर्रास चुकीच्या वीज बिलाने ग्राहकांच्या माथी हजारो रुपयाचा भूर्दंड मारला जात आहे. सध्या घरगुती वीज बिलाबाबत वाढत्या तक्रारी असून, अनेक दुरुस्तीचे प्रस्ताव धूळखात तुळजापूर कार्यालयाकडे पडून आहेत. तरी चुकीची वीज बिलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वीज ग्राहकांतून होत आहे. (वार्ताहर)मिटरची रिडींग वेळेत व दर महिन्याला झाल्यास ग्राहकांना योग्य वीज देयक मिळेल. पण बील बनविणाऱ्या कर्मचाऱ्यास रिडींगमध्ये वापरलेले युनिटचा मेळ घालत सर्रास महिन्याला १ हजार ते १५०० रुपयाची बिले महिन्याला लादली जातात. दुरुस्तीच्या नावाखाली ग्राहक बील भरण्यास तयार होत नाही. नवीन बसविलेल्या मिटरप्रमाणे बिलाची आकारणी करावी.महिन्यात किती युनिट वीज वापरली याची नोंद दर महिन्याला घेतली जात नाही. त्यामुळे हे काम खासगी एजन्सीला दिले होते. तर मिटर रिडींग घेण्याचे बंद झाले तेंव्हा अंदाजपंचे महिन्यात किती युनिट बील दिले. त्यावरुन चालू महिन्यात तशाच प्रकारे वीज बिलाची आकारणी करुन वीज देयक दिले जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ४याबाबत माळुंब्रा उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता सावळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, उपकेंद्रांतर्गत ज्या गावांत मिटर बसविले आहेत, त्यातील तीन गावांतील मिटरची नोंद संगणकात करण्याचे राहिले होते. हे काम सध्या प्रगतीपथावर असून, येत्या दोन-तीन दिवसांत ते पूर्ण होणार असून, यानंतर ग्राहकांना बिलाबाबत कसलीही अडचण येणार नाही. तसेच सध्याही ग्राहकाकडून जेवढी वीज वापरली तेवढेच बिल घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
नवीन मीटर बसवूनही वीज बिलांचा घोळ कायम
By admin | Updated: September 5, 2014 00:56 IST
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत वीज ग्राहकांना अचूक वीज बिल मिळावे, वीज चोरीस आळा बसावा, यासाठी १५०० मिटर नव्याने बसविण्यात आले.
नवीन मीटर बसवूनही वीज बिलांचा घोळ कायम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}