शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 8, 2014 01:01 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

जालना : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी दमदार, मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून बळीराजा पेरणी व लागवडीच्या कामाला लागला आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात वरूणराजाचे आगमन उशिरा झाले आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.३२ मि.मी. असून ७ जुलैपर्यंत किमान १७७. ६९ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षात या तारखेपर्यंत केवळ ४.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. भोकरदन तालुक्यात रात्री उशिरा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर जालन्यासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद तालुक्यांमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. पहाटे ३ ते ६ या वेळेत जिल्ह्यात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गुरूवारी जालना शहरात सुमारे तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. याशिवाय गोलापांगरी, पारडगाव, वडीगोद्री व अंबड तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने ७ जुलैपूर्वी जिल्ह्यात २१.४७ मि.मी. पावसाची नोंद होती. रविवारी मध्यरात्रीनंतर १०.९९ मि.मी. पाऊस झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पावसाची नोंद ३२.४६ मि.मी. एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची लागवड, पेरणीसाठी लगबगभोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात गेल्या महिनाभराची पावसाची प्रतीक्षा संपली असून परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे़ यामुळे ७ रोजी जवळपास ८0 टक्के लागवडी केल्या़ पावसाचा एकही थेंब पावसाचा पडला नसल्याने शेतकऱ्यानी पेरणीपूर्व मशागती करुन पावसाची प्रतीक्षा करीत होते़ पावसाने विलंब केल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला होता़६ रोजी अचानक जोरदार पाऊस बरसला़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने दि़७ रोजी सकाळीच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग सुरु केल्याची दिसून आले़ आज जवळपास ८0 टक्के शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे समजते़ या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे़ गतवर्षी १0 जुलैपर्यंत खरिपाच्या पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली होती़ या वर्षी पेरण्या लाबंल्या असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे़रविवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारनंतरही जालना तालुक्यात काही भागात ठिकाणी ढगाळ वातावरण होते