शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: July 29, 2014 01:08 IST

लातूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सर्वदूर पाऊस झाला असून, जवळपास दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिला होता.

लातूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सर्वदूर पाऊस झाला असून, जवळपास दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिला होता. त्यामुळे पिके सुकू लागली होती. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावल्याने या पिकांना जीवदान मिळाले आहे. तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे.जिल्ह्यातील जळकोट तालुका वगळता सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत अन्यत्र पाऊस झाला. लातूरसह रेणापूर, औसा, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, निलंगा, देवणी व अहमदपूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात लातूर जिल्ह्यात फक्त ४७.०७ मि.मी. पाऊस झाला, तर कालपर्यंत ११०.०७ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सरासरी ५.०१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत ११५.०८ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ६६.०५ टक्के आहे. सोमवारी दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. तरीही हा पाऊस समाधानकारक नाही. नद्या, ओढे, तलाव अद्यापही कोरडेच आहेत. तब्बल दोन ते अडीच तास पाऊस पडूनही पाणी जमिनीबाहेर आले नाही. शिरूर अनंतपाळ तालुक्याची पावसाची सरासरी ७५० मि.मी. असली, तरी आजपर्यंत केवळ २३१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर जिल्ह्याची २८ जुलैपर्यंतची पावसाची सरासरी ३३७.१ मि.मी.ची आहे. परंतु, आतापर्यंत फक्त ११५.८ मि.मी. पाऊस पडला आहे. जुलैअखेर यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. या आठही मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा अद्यापही ज्योत्याखालीच आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे. २५ जुलै रोजी जिल्ह्यातील लातूर तालुक्यात २.५० मि.मी., औसा तालुक्यात १.४२ मि.मी., रेणापूरमध्ये ०.७५, उदगीरमध्ये २.२८, चाकूरमध्ये २.२०, निलंग्यामध्ये १.३७, तर शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, अहमदपूर तालुक्यांत पाऊस निरंक होता. सोमवारी मात्र याही तालुक्यात पावसाची रिपरिप होती. त्यामुळे पिकांना सध्या तरी जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)पिकांना जीवदान...लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा ४ लाख ९७ हजार ९१८ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्सवर पेरा झाला आहे. त्याखालोखाल ९१ हजार ०३ हेक्टर्सवर तुरीची पेरणी झाली आहे. या सर्व पिकांसाठी पोषक पावसाची गरज आहे. सध्या रिपरिप झाल्यामुळे बळीराजासाठी दिलासा आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले, मात्र समाधानकारक पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे सध्याही शहरासह अनेक गावांत पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊसरिपरिप पावसामुळे पिकांना मिळाले जीवदानजळकोट तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र रिपरिप पाऊसबळीराजाला मिळाला दिलासा