शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल लागणार २३ आॅगस्टपूर्वी?

By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST

औरंगाबाद : मान्यताप्राप्त प्राध्यापकांनी अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात योगदान द्यावे. ज्यामुळे विद्यापीठाला २३ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर करता येईल.

औरंगाबाद : मान्यताप्राप्त प्राध्यापकांनी अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात योगदान द्यावे. ज्यामुळे दरवर्षी निकाल जाहीर करण्यासाठी होणारा विलंब टाळून यंदा विद्यापीठाला २३ आॅगस्टपूर्वी निकाल जाहीर करता येईल. जे प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात कुचराई करतील, त्यांच्याविरुद्ध तसेच संबंधित महाविद्यालयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सर्व प्राचार्यांची बैठक कुलगुरू डॉ. चोपडे यांनी विद्यापीठात घेतली. बैठकीत उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात किमान ५० टक्के मान्यताप्राप्त प्राध्यापकांना सहभागी करण्याचे आवाहन डॉ. चोपडे यांनी केले. विद्यापीठाशी संलग्नित १८ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, त्यात ३० हजार विद्यार्थी शिकतात. २ जून रोजी अभियांत्रिकी विद्याशाखेची परीक्षा सुरू झाली. ही परीक्षा सोमवारी ७ जुलै रोजी संपणार आहे. नियमानुसार परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असते; पण मागील काही वर्षांपासून प्राध्यापकांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे उत्तरपत्रिका तपासणीमध्ये उशीर होतो. प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठविण्याची जबाबदारी प्राचार्यांनी घ्यावी. जर प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आले नाहीत, तर संबंधित महाविद्यालय तसेच प्राध्यापकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. चोपडे यांनी दिला.