ब्रेकअपनंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची माजी प्रियकराकडून बदनामी; प्रायव्हेट फोटो व्हायरल
By राम शिनगारे | Updated: March 23, 2023 20:11 IST2023-03-23T20:11:07+5:302023-03-23T20:11:58+5:30
काही दिवसांनी दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाले. मुलीने पुन्हा मैत्री करावी म्हणून केले ब्लॅकमेल

ब्रेकअपनंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची माजी प्रियकराकडून बदनामी; प्रायव्हेट फोटो व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : शहरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीच्या माजी प्रियकराने सोशल मिडियात तिच्या नावाने बनावट अकाऊंट ओपन करीत त्यावरून तिच्या मैत्रिणीला दोघांचे अश्लील छायाचित्र पाठविले. त्यानंतर ब्लॅकमेल करून प्रेमाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात आयटी ॲक्टसह विनयभंगाचा गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
सुरज चंद्रवदन शहा (२२, रा. राजाबाजार परिसर) असे आरोपीचे नाव आहे. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील तरुणी शहरातील एका अभियांत्रकी महाविद्यायात तृतीय वर्षात शिक्षण घेते. आरोपी सुरज शहा हा पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. या दोघांची ओळख काही महिन्यांपूर्वी एका वडापावच्या गाडीवर झाली होती. त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे अनेकदिवस रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी दोघांनी खाजगी छायाचित्रे काढली होती. काही दिवसांनी दोघांमध्ये वाद होऊन ब्रेकअप झाले. त्यानंतर सुरजने मैत्री कायम ठेवण्यासाठी तरुणीचा पाठलाग करणे सुरू केले. त्यास प्रतिउत्तर तरुणी देत नसल्यामुळे त्याने स्नॅनपचॅटवर तरुणीचे बनावट अकाऊंट तयार केले. त्या अकाऊंटवरून तरुणीच्या मैत्रीणीला फ्रेंड रिवेस्ट पाठवुन तिला दोघांचे अश्लिल फोटो पाठवले. हा प्रकार त्याने १ ते २८ फेब्रवारीदरम्यान केला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने सातारा पोलिस ठाणे गाठुन सुरज शहा याच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक प्रशांत पाेतदार करीत आहेत.