शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याच्या संघर्षाचा शेवट आत्महत्येने

By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड शाईनिंगच्या जमान्यात प्रत्येक वस्तूचा भाव उत्पादक ठरवतो, परंतु घाम गाळून पिकवलेल्या शेतीमालाचा भाव बळीराजाला ठरवता येत नाही.

व्यंकटेश वैष्णव, बीडशाईनिंगच्या जमान्यात प्रत्येक वस्तूचा भाव उत्पादक ठरवतो, परंतु घाम गाळून पिकवलेल्या शेतीमालाचा भाव बळीराजाला ठरवता येत नाही. शेतीमालांना आधारभूत किंमतदेखील मिळत नाही. मग काय मातीमोल किंमतीत धान्य विकून शेतकरी मोकळा होतो. मोकळा कसला कर्जबाजारी होतो. अन् सुरू होतो जगण्यासाठीचा संघर्ष, यातून नैराश्य, व्यसनाधीनता आणि नंतर आत्महत्या.... ५ मे २००५ साली न्यायालयाने शेतकरी आत्महत्येची कारणे सांगितली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती मालाला आधारभूत किंमत मिळत नाही असे सांगून केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या किमतीत ३८ टक्के किंमत कमी दिली जाते. टाटा विज्ञान संस्थेच्या पहाणीवरून न्यायमूर्ती क्षितीज व्यास व न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या न्यायालयाने याबाबत निर्णय दिला होता. जिल्हयात मागील सहा महिन्यात ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यामध्ये २२ ते ५२ वर्ष वयोगटातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.५५ पैकी २५ ते ३५ वयोगटातील २३ च्या जवळपास शेतकरी आहेत. केवळ जमिनींची नापिकी अथवा गारपीट यामुळेच शेतकरी आत्महत्या करतात असे नाही. कारण शेतकरी हा अनेक घटकांचा पालक आहे. त्यामुळे त्याच्या स्वाभीमानाला ठेच पोहोचली की, शेतकरी आत्महत्या करतात, हे ना शासनाच्या लक्षात आले आहे, ना राजकीय पक्षांच्या. शेतकऱ्यांना भविष्यात तरी आपल्या शेती मालाचा भाव स्वत: ला ठरवता येईल याचा विश्वास शेतकऱ्यांना वाटत नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही मात्र खत, बियानांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना कर्ज काढून खत, बियाणे खरेदी करावे लागते. यातच निसर्गाने दगा दिला की, शेतकरी पुरता कोलमडून जातो, असे मानवलोक संस्थेतील सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहियांना यांनी सांगितले. यावर उपाय काय करता येऊ शकतो, हे सांगताना ते म्हणाले की, प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन ठिकाणी सहकारी सोसायटीचे गोडावून उभारले पाहिजेत.जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नसेल तेव्हा संबंधित शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सहकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये ठेवायचा व पन्नास टक्के रक्कम सोसायटीकडून घ्यायची. धान्याचे भाव वाढतील, तेव्हा उर्वरित पैसे शेतकऱ्यांनी घेऊन जायचे, असे प्रयोग शासनाने शेतकऱ्यांसाठी राबविले तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे वापरण्याची गरज पडणार नाही, असे मानवलोकचे प्रमुख द्वारकादास लोहिया यांनी यावेळी सांगितले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची मदत घेतली तर संपूर्ण जिल्ह्यात कृषीबाबत नवीन प्रयोग राबविता येऊ शकतात.आत्महत्या नव्हे , सरकारने घेतलेले बळी आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचे बळी शेतकरी ठरलेले आहेत. आपत्ती निवारण कायद्यात जर दुष्काळ, गारपीट, वादळ वारा, वीज पडून नुकसान या बाबी अंतर्भूत करून शेतकऱ्यांना सरंक्षण करणे आवश्यक आहे.परंतु आपत्ती निवारण कायद्यात शेतकऱ्यांवर येणाऱ्या आपत्तींचा समावेश नाही. ही शोकांतीकाच आहे. या कायद्यात शेतकरी आत्महत्यांचा विषय घेतला असता तर जिल्हाधिकारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करू शकले असते.शासन धोरणे बदलून शेतकऱ्यांकडे एक माणूस म्हणून पाहणार नाही. तोपर्यंत आत्महत्या होतच राहणार आहेत. या आत्महत्या नाहीत तर सरकारने घेतलेले बळी आहेत, असे शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास अपेट म्हणाले़