शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

छत्रपती संभाजीनगरात एन्काउंटर; पोलिसांवर गोळीबार व गाडी घालणारा दरोडेखोर चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:42 IST

वाळूज एमआयडीसीमध्ये उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगर: शहराजवळील वाळूज एमआयडीसीमधील वडगाव कोल्हाटी ते सांजापूर रोडवरील एका हॉटेलजवळ सोमवारी (२६ मे) मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचून एका गुन्हेगारी इतिहास असलेल्या आरोपीला एन्काउंटरमध्ये ठार केले. अमोल खोतकर असं मृत आरोपीचं नाव असून तो उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी होता.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल खोतकर हा वाळूज एमआयडीसी मध्ये सोमवारी रात्री एका हॉटेलवर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव सांजापूर रोडवरील हॉटेल परिसरात रात्री साडेअकरा वाजता सापळा रचला. ठरल्याप्रमाणे खोतकर त्या ठिकाणी दाखल झाला. मात्र, त्याला समोर पोलीस दिसल्यानंतर त्याने गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगाने गाडी चालवत पोलिसांवर घातली. या अचानक झालेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल एपीआय रविकिरण गच्चे यांनी गोळीबार केला. या गोळीबारात खोतकर गंभीर जखमी झाला आणि त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अमोल खोतकर याच्यावर लड्डा दरोडा प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

काय आहे लड्डा दरोडा प्रकरणबुधवार, १५ मे रोजी मध्यरात्री २ ते ४ या वेळेत लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता. यावेळी घरात झोपलेल्या लड्डा यांच्या चालकाचे तोंड चिकटपट्टीने आणि हात रुमालाने बांधण्यात आले होते. दरोडेखोरांनी त्याच्या छातीवर पिस्तूल रोखून ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने आणि ७० हजारांची रोख रक्कम असा एकूण लाखोंचा ऐवज लुटून नेला होता. विशेष म्हणजे, ही घटना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर घडली होती.

अशी झाली चकमकदरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपी अमोल खोतकर हा योगेश हसबे याच्याकडे हॉटेलवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री सापळा रचण्यात आला. रात्री सुमारे ११ वाजता खोतकर वडगाव कोल्हाटी येथील हसबे यांच्या हॉटेलजवळ कार घेऊन आला. मात्र, पोलिसांना समोर पाहताच त्याने गोळी झाडली व कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली. त्यानंतर एपीआय रवी किरण गच्चे यांनी प्रतिउत्तरादाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काऊंटर केला. त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी