शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जनता मार्केट रिकामे करा- जी़श्रीकांत

By admin | Updated: June 27, 2014 00:15 IST

नांदेड : शिवाजीनगर येथील जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तत्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला

नांदेड : शिवाजीनगर येथील जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तत्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला असून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गाळेधारकांनी आपला व्यवसाय स्थलांरित करून संकुल रिकामे करावे, अशा सूचना आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केल्या़ महापालिकेत गुरूवारी गाळेधारकांसोबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते़ यावेळी आयुक्त म्हणाले, जनता मार्केट संकुलातील व्यापाऱ्यांनी आपले स्थलांतर करावे़ संबधित गाळेधारकांना त्यांच्या व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली जाईल़ महापालिकेच्या वतीने जनता मार्केट नव्याने उभारून गाळेधारकांच्या सहभागाने पुनर्वसनाची योजना तयार केली जाईल़ जनता मार्केट इमारतीच्या सुरक्षिततेसंबधात औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने केलेल्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला असून त्याची माहिती गाळेधारकांना देण्यात आली़ शिवाजीनगर जनता मार्केट पाडल्यानंतर बीओटी तत्वावर इमारत उभी करण्याचा मनपाचा कोणताही निर्णय नाही़ या जागेत आधुनिक सुविधांसह नवीन भव्य व्यापारी संकुल उभारण्यात येईल़ नव्या संकुलात पूर्वीच्या गाळेधारकांना पुन्हा नव्याने जागा दिली जाईल़ एकही गाळेधारक यापासून वंचित राहणार नाही, असेही आयुक्त म्हणाले़ नव्या संकुलासाठी लागणाऱ्या खर्चाचा भार गाळेधारकांना उचलावा लागेल़ गाळेधारकांना दुकान सोडायचे झाल्यास दिलेली मूळ अनामत परत करणे, ३० वर्षाचा करार करणे, गाळा विकण्याचे हक्क धारकास देवून त्यातून आलेली २५ टक्के रक्कम मनपाकडे हस्तांतरीत करणे आदींवर चर्चा करण्यात आली़ (प्रतिनिधी)