दुसऱ्या प्रशिक्षणालाही कर्मचाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: October 27, 2015 00:19 IST2015-10-27T00:01:54+5:302015-10-27T00:19:00+5:30
भोकरदन : निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

दुसऱ्या प्रशिक्षणालाही कर्मचाऱ्यांची दांडी
भोकरदन : निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षणालासुध्दा ७ मतदान केंद्र अध्यक्ष व ६ मतदान अधिकारी गैरहजरी आढळून आले. या १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे तहसिलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले़
भोकरदन तालुक्यात होत असलेल्या ग्रामपचंयतीच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात हालगर्जी केली तर त्याच्यांविरूध्द कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा तहसिलदार मुकेश कांबळे यांनी २६ आॅक्टोबर रोजी घेतलेल्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी दिला आहे़
तालुक्यात ९२ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून , उर्वरित ८५ ग्रामपंचायतींसाठी १ नोव्हेबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १ हजार ४०० अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे २६ आॅक्टोबर रोजी शहरात प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी तहसिलदार मुकेश कांबळे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार एस़आर डोळस यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी काही अडचणीची सुध्दा विचारणा केली. कारण एका वार्डात तीन उमेदवार आहेत. त्यामुळे काही कर्मचारी नवीन असल्याने त्यांना सखोल माहिती देण्यात आली. तसेच निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारानी आपल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून , या कक्षाची जबाबदारी कोषागार अधिकारी बी़ ए़ मिसाळ यांच्याकडे सादर करावा तसेच निवडणुकीसाठी प्रचार कार्यालय व वाहन लावताना परवाना आवश्यक असून बीओ डी़ के़पांडव यांच्याकडे अर्ज करून परवानगी घेणे आवश्यक आहे. काही प्रकार आढळून आल्यास उमेदवाराविरूध्द आचारसंहितेचा भंग करण्याचा इशारा दिला.