शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

कपातीच्या रकमेबाबत कर्मचार्‍यांची बेजबाबदारी

By admin | Updated: May 24, 2014 00:48 IST

हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत

हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, कर्जाचे हफ्ते याबाबत कपात केल्या जाणार्‍या रकमेबाबत पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांकडून बेजबाबदारीने काम केले जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कपात केलेली रक्कम ३ महिन्यानंतर संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहे. जिल्हा परिषदेंतर्गत येणार्‍या शिक्षक व इतर कर्मचार्‍यांची दरमहा भविष्य निर्वाह निधी, जीवन बिमा निगम, विविध बँका, पतसंस्था यांचे कर्जाचे हफ्ते याबाबतची रक्कम संंबंधित पंचायत समितीकडून कपात केली जाते. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील पंचायत समित्यांमध्ये याबाबतचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍याकडून केल्या जात असलेल्या दिरंगाईचा फटका संबंधित शिक्षक व कर्मचार्‍यांना बसत आहे. पंचायत समितीच्या आस्थापनेवर असलेल्या कर्मचार्‍यांची दरमहा कपातीची रक्कम त्यांच्या वेतनातून नियमितपणे कपात केली जाते. ही रक्कम तातडीने कपात केलेल्या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीत, बँका, पतसंस्थेच्या कर्जामध्ये तसेच एलआयसीचे हफ्ते भरण्याकरिता जमा होणे आवश्यक आहे; परंतु सद्य:स्थितीत एका महिन्यात कपात केलेली रक्कम जवळपास ३ महिन्यानंतर संबंधितांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उदाहरणच सांगायचे असेल तर जानेवारीमध्ये कपात झालेली रक्कम थेट मे महिन्यात संबंधितांच्या खात्यावर जमा होत आहे. खात्यावर उशिरा रक्कम जमा होत असल्याने संबंधितांना नाहक दंड सोसावा लागतो. शिवाय त्यांना ३ महिन्यांच्या व्याजालाही मुकावे लागते. त्यामुळे दिरंगाईने जमा केलेली रक्कम ३ महिने जाते तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे विचारणा केली असता कपातीचे धनादेश व कपातपत्रक हे पंचायत समिती स्तरावरून वेळेवर मिळत नसल्याचे सांगण्यात येते. पंचायत समितीकडे याबाबत विचारणा केली असता, संबंधितांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. पं.स.मध्ये या विभागाचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍याच्या बेजबाबदारपणाचा फटका मात्र संबंधित शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो. याबाबत महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी पं.स.कडे अनेकवेळा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आता याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)