कृषी विभागातील कर्मचारी संपावर

By Admin | Updated: August 15, 2014 00:03 IST2014-08-14T23:25:59+5:302014-08-15T00:03:03+5:30

सेलू : प्रलंबित मागण्यांसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ११ आॅगस्टपासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू केले आहे़

Employee strikes in the agricultural division | कृषी विभागातील कर्मचारी संपावर

कृषी विभागातील कर्मचारी संपावर

सेलू : प्रलंबित मागण्यांसाठी कृषी विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ११ आॅगस्टपासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू केले आहे़
कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व वरिष्ठ अधिकारीही विविध मागण्यांसाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत़ कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जावाढी बाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यासाठी घेतलेला निर्णय रद्द करावा, नैसर्गिक आपत्तकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाचा निर्णयाची अंमलबजावणी करावी, आधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देवून मारहाणीबाबत अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा़ शून्य आधारित अर्थसंकल्पात कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी नियमित करावा, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील सर्व पदे शंभरटक्के कृषी सहाय्यकातून पदोन्नतीने भरावी तसेच कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्यात वाढ करावी, यासह संघटनेने तेरा मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Employee strikes in the agricultural division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.