उदगीर जिल्हा मागणीस जोर

By Admin | Updated: August 22, 2014 00:59 IST2014-08-22T00:41:09+5:302014-08-22T00:59:24+5:30

उदगीर : उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीस आता पुन्हा जोर चढला आहे़ यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीसोबतच युवा समितीनेही मुख्यमंत्र्यांना नव्याने साकडे लागले आहे़

Emphasis to the district demand | उदगीर जिल्हा मागणीस जोर

उदगीर जिल्हा मागणीस जोर



उदगीर : उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीस आता पुन्हा जोर चढला आहे़ यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती कृती समितीसोबतच युवा समितीनेही मुख्यमंत्र्यांना नव्याने साकडे लागले आहे़
उदगीर जिल्हा करावा, अशी मागणी साधारणत: गेल्या ५८ वर्षांपासून सुरु आहे़ उदगीर हे ऐतिहासिक शहर महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या सीमेवर वसलेले असून सध्याचा विस्तार पाहता हे ठिकाण जिल्हा करणे अत्यावश्यक असल्याचे कृती समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ उदगीर, देवणी व जळकोट या तालुक्यांना लातूर प्रशासकीयदृष्ट्या गैरसोयीचे ठरते़ तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड व देगलूरचीही अशीच अवस्था आहे़ त्यामुळे या पाच तालुक्यांसह अहमदपूर, चाकूर व शिरुर अनंतपाळ तालुका उदगीरशी जोडून जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी आहे़ याशिवाय, बजारपेठ, उद्योग याठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत़ आरोग्याच्या सुविधा देणारे शासकीय व खाजगी मोठे प्रकल्प कार्यान्वित आहेत़ कृषी बाजारपेठेचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे़ कडधान्ये व तेलबिया व्यापाराकरिता उदगीर राज्यात प्रसिद्ध आहे़ शहर ब्रॉडगेजने जोडले आहे़ प्रशासकीय कार्यालयांकरिता जागा उपलब्ध आहे़ त्यामुळे १९५६ पासून असलेली उदगीरकरांची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी उदगीर जिल निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर भोसले, निमंत्रक सुरेश पाटील नेत्रगावकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे़(वार्ताहर)

उदगीर जिल्हा निर्मितीसाठी कृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे़ या लढ्याला आता युवा कृती समितीचे बळ लाभले आहे़ उदगीर जिल्हा निर्मिती युवा कृती समिती स्थापन करुन अध्यक्ष विजय निटुरे यांच्यासह समन्वयक अजित बेळकोणे, पप्पु वडगावे, राम मोतीपवळे, अहमद सरवर, आशिष अंबरखाने युवकांनीही मुख्यमंत्र्यांना जिल्हा निर्मितीसाठी साकडे घातले आहे़

Web Title: Emphasis to the district demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.