पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादेत इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 18:47 IST2019-06-02T18:15:33+5:302019-06-02T18:47:51+5:30

पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ लँडिंग झाले.

 Emergency landing in Aurangabad, Patna-Mumbai flight | पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादेत इमर्जन्सी लँडिंग

पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादेत इमर्जन्सी लँडिंग

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ लँडिंग झाले. विमानात १६५ प्रवासी असून, तांत्रिक बिघाडामुळे विमान औरंगाबादेत उतरल्याची माहिती विमानतळ प्राधिकरण सूत्रांनी दिली. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानतळावर रग्णवाहिकांचा ताफा दाखल झाला. पाठोपाठ पोलिसांचाही ताफा दाखल झाला होता. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते. ब-याच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानाची तांत्रिक तपासणी करून ते रवाना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title:  Emergency landing in Aurangabad, Patna-Mumbai flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.