अकरा चोरटे जेरबंद

By Admin | Updated: May 16, 2014 00:14 IST2014-05-15T23:48:37+5:302014-05-16T00:14:59+5:30

उस्मानाबाद: स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकाने नाकाबंदी करून चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या ११ चोरट्यांना जेरबंद केले़

Eleven thieves Jeraband | अकरा चोरटे जेरबंद

अकरा चोरटे जेरबंद

उस्मानाबाद: स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकाने सोमवार ते बुधवार या तीन दिवसाच्या कालावधीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या ११ चोरट्यांना जेरबंद केले़ त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल असा ७९ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपळा-विमानतळ मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि माधव गुंडीले व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास सजा भिमा पवार, सिकंदर सरदार काळे या दोघांना जेरबंद करण्यात आले़ त्यांच्याकडून दोन मोबाईल, विना नंबरची दुचाकी असा ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ वरूड-पवारवाडी मार्गावर श्रीरंग सोमा पवार, बाळासाहेब कालिदास काळे यांना अटक करून मोबाईल, विना नंबरची दुचाकी असा ११ हजाराचा मुद्देमाल जप्त केला़ ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि संभाजी पवार व पथकाने उस्मानाबाद-औसा मार्गावर सुनिल जगन पवार, उत्तम पवार (रा़जुनाबस डेपो) यांना अटक केली़ त्यांच्याकडून एक दुचाकी (क्ऱएम़एच़२५-जे १६७७) व मोबाईल असा १५५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याशिवाय ढोकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी दरोडा प्रतिबंधक पथकाने गोवर्धनवाडीनजीकच्या तेरणा तलावाजवळ मधुकर उमराव पवार, दादा उमराव पवार (रा़भाटशिरपुरा) यांना अटक केली़ तर भूम पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी दरोडा प्रतिबंधक पथकाने भूम-परंडा मार्गावर बबन बाबू काळे, लक्ष्मण बापू काळे (राग़ोलेगाव) यांना अटक केली़ या प्रकरणी वरील ११ जणाविरूध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोर्‍यांचा उलगडा होईल अटक करण्यात आलेल्या ११ जणांवर यापूर्वीही जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा आदी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ त्यांच्याकडून विविध चोर्‍यांचा व मुद्देमालाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे़

Web Title: Eleven thieves Jeraband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.