छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी व याद्या तयार कराव्या लागणार असून १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या पात्रतेवर पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. डिसेंबर २०२६ मध्ये या मतदारसंघासाठी निवडणूक होईल. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
विभागीय आयुक्तालयात मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर आयुक्तांनी पत्रकारांना माहिती दिली. ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी ते मतदार प्रसिद्धीपर्यंतच्या पूर्ण कार्यक्रमाची माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते.
गेल्या निवडणुकीत ३ लाख ५२ हजार ३९६ नोंदणी२०२० साली झालेल्या निवडणुकीत ३ लाख ५२ हजार ३९६ मतदार नोंदणी झाली होती. ७५० नियमित व ६३ अतिरिक्त मतदान केंद्र होती. आगामी निवडणुकीसाठी २४५ अधिकाऱ्यांची मतदान नोंदणी व इतर कामांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
Web Summary : Marathwada graduate constituency requires fresh voter registration by November 1, 2025, for the December 2026 election. Existing voters must re-register. Divisional Commissioner Papalkar urged eligible voters to register during a press conference, outlining the registration process.
Web Summary : मराठवाड़ा स्नातक निर्वाचन क्षेत्र को दिसंबर 2026 के चुनाव के लिए 1 नवंबर, 2025 तक नए मतदाता पंजीकरण की आवश्यकता है। मौजूदा मतदाताओं को फिर से पंजीकरण कराना होगा। संभागीय आयुक्त पापलकर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में पंजीकरण प्रक्रिया की जानकारी देते हुए योग्य मतदाताओं से पंजीकरण कराने का आग्रह किया।