शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

By admin | Updated: July 7, 2014 00:16 IST

संजय कुलकर्णी , जालना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

संजय कुलकर्णी , जालनापहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी निरंतर शिक्षण योजनेद्वारे कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.निरंतर शिक्षण कार्यालयामार्फत निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम राबविली जाते. जालना जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. यापूर्वी निरंतर शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा साक्षरता परिषदेस अनुदान प्राप्त होत होते. परंतु सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने बंद केल्यामुळे निरंतर शिक्षण केंद्रे बंद करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर निरंतर शिक्षणांतर्गत कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राज्य शासन, स्थानिक संस्था, सीएसआर व एनजीओ यांच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे १५ वर्षे वयापुढील निरक्षरांना तसेच इयत्ता १ ली ते ३ री, इयत्ता ४ थी ते ५ वी व इयत्ता ७ वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण घेताना शाळाबाह्य झालेल्या प्रौढांना परीक्षेला बसवून त्यांना एनआयओएसचे इयत्ता ८ वी चे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात पूर्वी सुरू असलेली निरंतर शिक्षण केंद्रांची संख्या, निरक्षरांची संख्या, नवसाक्षरांची संख्या, तसेच शाळाबाह्य झालेल्या प्रौढांची संख्या मागविण्यात आली आहे. याबाबत निरंतर शिक्षणाधिकारी तथा जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे म्हणाले की, कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाने माहिती मागविली आहे.जुना कार्यक्रम बंदनिरंतर शिक्षण विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘साक्षर भारत कार्यक्रम’ सुरू केला होता. त्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये मानधनावर जिल्ह्यात १५६२ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. तर स्वेच्छेने मोफत सेवा देण्यासाठी ७८१ ग्रामपंचायतींद्वारे स्वयंसेवकांचीही निवड करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम बंद पडला.