शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तच्या ‘कारीं’नी जिंकले मन!

By admin | Updated: May 26, 2014 01:14 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक जामा मशीद येथे आयोजित आंतरराष्टÑीय ‘कुराण किरअत’ कार्यक्रमाचा दुसरा दिवस इजिप्त येथील कारी बांधवांनी गाजवला.

औरंगाबाद : ऐतिहासिक जामा मशीद येथे आयोजित आंतरराष्टÑीय ‘कुराण किरअत’ कार्यक्रमाचा दुसरा दिवस इजिप्त येथील कारी बांधवांनी गाजवला. पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात विदेशी स्पर्धकांनी औरंगाबादकरांची मने जिंकली. मागील काही वर्षांपासून शहरात ‘दारुल किअरत कलिमियाँ’ यांच्यातर्फे आंतरराष्टÑीय पातळीवर ‘कुराण किरअत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. २३ आणि २४ मे रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री देशभरातील वेगवेगळ्या कारी बांधवांनी पवित्र धर्मग्रंथ ‘कुराण’चे पठण करून उपस्थित भाविकांची दाद मिळविली. शुक्रवारी रात्री २ वाजता कार्यक्रम समाप्त करण्यात आला होता. समारोपाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री ९ वाजेपासून ऐतिहासिक जामा मशीदमध्ये भाविकांना पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. आंतरराष्टÑीय ख्यातीचे कारी कुराण पठण करणार असल्याचे सर्वांनाच माहीत होते. त्यामुळे भाविकांनी अलोट गर्दी केली होती. विदेशातील कारी बांधवांचा उत्साह वाढविण्यासाठी अधूनमधून भाविक घोषणाबाजी करीत होते. पहाटे ३ वाजता कारी मोहंमद रमजान अजाज यांच्या उपस्थितीत दुआ करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. ‘कुराण किरअत’ कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मुफ्ती खलील उर रहेमान यांनी अध्यक्षपद भूषविले. दुसर्‍या दिवशी जामा मशीदचे प्रमुख मौलाना रियाज फारुकी यांनी अध्यक्षपद भूषविले. व्यासपीठावर मौलाना रशीद मदनी, खारी निसार अहेमद, मोहीब उल्लाह, मौलाना नसीम मुफ्ती, एम.एम. खान, शाहारेख नक्षबंदी, खाजा अमिनोद्दीन यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ‘कुराण किरअत’ कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी बुढीलेन व आसपासच्या तरुणांनी थंड पाणी, चहा, नाश्ता आदींची सोय केली होती. कार्यक्रमास आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. हा कार्यक्रम आंतरराष्टÑीय पातळीवरील असल्याने ध्वनिव्यवस्था आणि प्रकाशयोजनाही अप्रतिम होती. कारी अब्दुल अल अली मिकरी, कारी मोहंमद रमजान अजाज, कारी आदिल अल्बाज तालीम, कारी मुतवल्ली, कारी मोहंमद अलपुरैदी, कारी सलमान तलामी, कारी इस्माईल इंजिनिअर, कारी याहिया इंजिनिअर यांनी ‘कुराण’चे काही अध्याय निवडून किरअतची पेशकश केली. १,४०० वर्षांपासून पवित्र धर्मग्रंथ जगभरात वाचला जातो. या धर्मग्रंथातील शब्दांचे उच्चारण, स्वरांची नजाकत काय असते हे इजिप्तच्या कारींनी दाखवून दिले. परमेश्वराने त्यांना स्वरांची एक वेगळीच देण दिल्याचे उपस्थित भाविकांनी नमूद केले.