शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्था, संघटनांचा आज शैक्षणिक बंद

By admin | Updated: December 12, 2014 00:56 IST

औरंगाबाद :शुक्रवारी शैक्षणिक बंदची हाक दिली आहे, तसेच नागपुरात या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद : ४० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांचे फेरमूल्यांकन करण्याचा आदेश मागे घ्यावा, चिपळूणकर समितीच्या शिफारशी लागू करा, एमसीव्हीसीचा कायम शब्द वगळा, शिक्षण आयुक्त पद रद्द करा, विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्या, मध्यान्ह भोजन योजना लागू करा आदी मागण्यांसाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक-शिक्षकेतर संघटना, मुख्याध्यापक संघटना आदींनी शुक्रवारी शैक्षणिक बंदची हाक दिली आहे, तसेच नागपुरात या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. विविध संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने मराठी व उर्दू माध्यमांच्या जवळपास ४,८०० शाळांना सन २००० मध्ये कायम विनाअनुदानित म्हणून मान्यता दिली; परंतु कर्मचारी, शिक्षकांचे वेतन वगळता शासनाचे सर्व नियम या शाळांवर बंधनकारक केले. संघटनांच्या सततच्या आंदोलनानंतर सन २००९ साली कायम हा शब्द वगळण्यात आला. सन २०१२ पासून अनुदान देण्याचे घोषित केले; परंतु त्यासाठी मूल्यांकनाच्या जाचक अटी लादल्या. त्यामुळे फक्त ५७ शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या. २०१४ मध्ये शासनाने या अटी शिथिल करून पुन्हा मूल्यांकनाचे अर्ज मागितले. त्यात १,३४३ शाळा अनुदानास पात्र ठरल्या. त्या शाळांना ४० टक्के अनुदान देण्याचे ठरले; परंतु दि. २५ नोव्हेंबर रोजी सरकारने पुन्हा या शाळांचे फेरमूल्यांकन करण्याचा घाट घातला आहे.या निषेधार्थ महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेने बुधवारपासून तीन दिवस शाळा बंद आंदोलन पुकारून गुरुवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. उपरोक्त मागण्यांसाठी दि. १२ डिसेंबर रोजी शाळा बंदचा निर्णय मुंबई विभागाने घेतला होता. मुंबई विभागाला पाठिंबा देत औरंगाबादमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.