शिक्षण विभागाने केली विविध शाळांची तपासणी
By Admin | Updated: June 17, 2014 00:38 IST2014-06-17T00:16:11+5:302014-06-17T00:38:13+5:30
पालम : पहिल्याच दिवशी शाळा उघडताच शिक्षण विभागाकडून विविध उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी शाळांची तपासणी करण्यात आली आहे़

शिक्षण विभागाने केली विविध शाळांची तपासणी
पालम : पहिल्याच दिवशी शाळा उघडताच शिक्षण विभागाकडून विविध उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी शाळांची तपासणी करण्यात आली आहे़ यासाठी शिक्षण विभागाने शाळानिहाय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली होती़
१६ जून रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील शाळांना सुरुवात झालेली आहे़ पालम तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १ ते ६ शाळा आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळास्तरावर विविध उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले होते़ या उपक्रमाची अंमलबजावणी मुख्याध्यापक व शिक्षकांकडून झाली की नाही याचा आढावा घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आलेली आहे़ या तपासणीत शाळा सुरू झाली की नाही, पुस्तक वाटप, प्रवेश देणे, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत, शालेय पोषण आहार, शाळेची स्वच्छता, शिक्षकांची उपस्थिती या बाबींची माहिती घेण्यात आलेली आहे़ या पहिल्याच दिवशी शाळेची तपासणी करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्रातील कर्मचारी यांच्यावर देण्यात आली होती़ या तपासणीमुळे शाळास्तरावर कायम उपक्रम घेण्यात आले याची माहिती शिक्षण विभागाला मिळालेली आहे़ तपासणीसाठी गटशिक्षणाधिकारी संजय ससाने, विस्तार अधिकारी धनराज यरमाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़(प्रतिनिधी)