शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात बंधाऱ्याचे २२ लोखंडी दरवाजे चोरीला; पाणी साठवणुकीवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 14:15 IST

शिवना नदीवरील शंकरपूर बंधाऱ्याचे दरवाजे चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गंगापूर : तालुक्यातील शिवना नदीवरील शंकरपूर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे २२ लोखंडी दरवाजे चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २० ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. २६) अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलसंधारण विभागांतर्गत गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव शिवारातील शंकरपूर येथे शिवना नदीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यातील पाण्यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सिंचनाची सोय होते. दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटी या बंधाऱ्याची दरवाजे बसवून पाणी साठवणूक केली जाते. मात्र, २० ऑगस्ट रोजी या बंधाऱ्याची सुमारे २२ लोखंडी दरवाजे (किंमत १ लाख १० हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. 

ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी गावातील सरपंचांना याबाबत माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून २१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतच्या वतीने गंगापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले. माहिती मिळताच जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यानंतर सोमवारी सकाळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यंदा पाणी साठवणुकीवर परिणामशिवना नदीवर बांधलेल्या शंकरपूर बंधाऱ्याला ८० दरवाजे आहेत. याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होऊन परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होते. मात्र, यंदा यातील २२ दरवाजे चोरीला गेल्यामुळे पाणी साठवणूक कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे तत्काळ चोरीला गेलेले दरवाजे शोधा किंवा नवीन दरवाजे उपलब्ध करून द्या, अशी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी